पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची पंकजा मुंडे यांची मागणी

बीड – पूजा चव्हाण या युवतीने ८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री पुणे येथे तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या प्रकरणाचे सविस्तर अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या अन्वेषणाची मागणी केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील युवती आहे. तीच्या मृत्यूची बातमी धक्कादायक आहे. या युवतीच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हायला हवी.