मोक्षप्राप्तीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे सद्गुरुतत्त्व !

‘आयुर्वेदो अमृतानाम् ।’ म्हणजे ‘अमृतकर अशा गोष्टींमध्ये आयुर्वेद (आयुर्वेदप्रणीत तत्त्वे, पथ्य, नियम, औषधे) श्रेष्ठ आहे.’ त्याचप्रमाणे म्हणावेसे वाटते की, ‘सद्गुरुः मोक्षाय ।’ म्हणजे ‘मोक्षप्राप्तीची साधने, मार्ग अनंत असले, तरी त्यात सर्वश्रेष्ठ आहे ते सद्गुरुतत्त्व !’

कृतीदलाचा अहवाल आल्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीवर निर्णय ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कृतीदलाचा अहवाल आल्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीवर निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षणमंत्री या नात्याने बोलतांना २७ जानेवारीला विधानसभेत दिली.

सिंगापूर येथील मशिदींमध्ये आक्रमण करण्याचा कट रचणार्‍या एका भारतीय वंशाच्या ख्रिस्ती मुलाला अटक

२ मशिदींमध्ये आक्रमण करण्याच्या सिद्धतेत असणार्‍या भारतीय वंशाच्या १६ वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. तो सिंगापूरचा नागरिक असून तो प्रोटेस्टंट ख्रिस्ती धर्मीय आहे.

आनंदाची अनुभूती देणारा अद्भुत असा ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा सोहळा पहाणार्‍या पुणे येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवांना जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभेत लोकायुक्त दुरुस्ती विधेयक संमत

लोकायुक्त दुरुस्ती विधेयकांमुळे लोकायुक्तांचे अधिकार न्यून होणार आहेत. हे विधेयक संमत करण्याऐवजी ते सिलेक्ट समितीला पाठवावे, अशी विरोधकांनी मागणी केली; मात्र विरोधकांची मागणी धुडकावून विधानसभेत हे विधेयक संमत करण्यात आले.

मार्च अखेर सनबर्न महोत्सव साजरा करण्याविषयी आयोजकांकडून शासनाला अर्ज

गोव्यात २७ ते २९ मार्च या कालावधीत सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हलचे आयोजन करण्यास अनुमती देण्याची मागणी करणारा अर्ज महोत्सवाच्या आयोजकांनी शासनाला दिला आहे. या वृत्ताला पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनीही दुजोरा दिला आहे.

लेखी आश्‍वासनानंतर स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचे आंदोलन अखेर मागे

स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांतील सदस्याला सरकारी नोकरी देण्याच्या मागणीवरून स्वातंत्र्यसैनिकांच्या अनेक कुटुंबियांनी २२ जानेवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषण चालू केले होते.

सिंधुदुर्गातील कोरोनाची स्थिती

जिल्ह्यात २४ घंट्यांत नवीन २२ रुग्ण आढळले असून एकूण ५ सहस्र ८२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात २१२ रुग्णांवर उपचार चालू आहेत. ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

भ्रष्टाचार दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या ताज्या करप्शन पर्सेप्शन इंडेक्समध्ये भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी पावले उचललेल्या १८० देशांची सूची बनवण्यात आली आहे. यात भारत ८६ व्या, तर चीन ७८ व्या क्रमांकावर आहे.

‘ऑनलाईन’ नामजप सत्संग पाहून साधकांचे नातेवाईक आणि त्यांचे परिचित यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद !

२८ जानेवारीला आपण उत्तरप्रदेशमधील अशा काही जिज्ञासूंना जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती पाहिल्या. आज नामजप सत्संग पाहून साधकांचे नातेवाईक आणि त्यांचे परिचित यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद पाहूया.