पणजी, २८ जानेवारी (वार्ता.) – कृतीदलाचा अहवाल आल्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीवर निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षणमंत्री या नात्याने बोलतांना २७ जानेवारीला विधानसभेत दिली. आमदार जयेश साळगावकर यांनी विचारलेल्या एका तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते. ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२०च्या कार्यवाहीसाठी राज्यशासनाने २ कृतीदलांची स्थापना केली आहे. ही कृतीदले राज्यासाठी शालेय आणि उच्चमाध्यमिक शिक्षणाशी संबंधित धोरण निश्चित करणार आहेत. शालेय शिक्षणावरून कृतीदलाच्या आतापर्यंत ३ बैठका, तर उच्च माध्यमिक शिक्षणाशी संबंधित १ बैठक झाली आहे.