राजकारणातील ‘क्षमा’ !

एखाद्या राष्ट्राच्या पंतप्रधानांनी क्षमा मागणे याद्वारे त्या राष्ट्राचे संपूर्ण विश्‍वाच्या दृष्टीने असलेले अस्तित्व आणि महत्त्व यांची प्रचीती येते. यातूनच त्या राष्ट्राची प्रगती आणि विकास यांचा पुढील टप्पा आपसूक साधला जातो. क्षमायाचनेचा मार्गच देशाला राष्ट्रोत्कर्षापर्यंत नेतो.

हिंसेला प्रवृत्त करणार्‍या दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांवर बंदी घाला ! – सर्वोच्च न्यायालय

‘कुणाला हिंसेसाठी भडकवणे, हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक आहे; पण केंद्र सरकारने याविषयी काहीच पावले उचलेली नाहीत, असे दिसते’, अशा शब्दांत न्यान्यालयाने अप्रसन्नता व्यक्त केली.

संख्येऐवजी गुणात्मकता हवी !

भारतात कोट्यवधींची लोकसंख्या आहे, त्यातही सरकारी नोकरीतही कोटी लोक आहेत असे मानले, तरी भारताची स्थिती काही क्षेत्रे सोडली, तर बिकट का आहे ? राजकारणात काही लाख लोक आहेत, तरी राजकारण अतिशय खालच्या पातळीपर्यंत का जात आहे ?

सर्वोच्च न्यायालयाकडून तांडव वेब सिरीच्या निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार

वेब सिरीज तांडवचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता यांच्या अटकेला स्थगिती देण्याची ‘अ‍ॅमेझॉन इंडिया’ने केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.

क्रांतीवर दीपाजी राणे यांच्या क्रांतीला राष्ट्रीय मान्यता द्या !

क्रांतीवीर दीपाजी राणे यांनी पोर्तुगिजांच्या विरोधात नाणूस किल्ल्यावर क्रांती केली होती. या पहिल्या सशस्त्र क्रांतीला संपूर्ण भारतात प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे या क्रांतीला राष्ट्रीय मान्यता द्यायला हवी, अशी मागणी मराठी राजभाषेचे कार्यकर्ते मच्छिंद्र च्यारी यांनी केली.

१ फेब्रुवारी या दिवशी संसदेवर काढण्यात येणारा शेतकरी मोर्चा रहित !

१ फेब्रुवारी या दिवशी संसदेवर काढण्यात येणारा शेतकर्‍यांचा मोर्चा रहित करण्यात आला आहे. देहलीत झालेल्या हिंसाचारानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

चीनचा अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याधिकारी तिबेटी संस्कृतीचा अभ्यास करणार !

चीनकडून चालू असलेला अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने तिबेटचा इतिहास, तेथील संस्कृती आणि भाषा जाणून घेण्याची रणनीती बनवली आहे.

परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या मंडपाचे भूमीपूजन

शहरातील भालचंद्र महाराज संस्थानलगतच्या रस्त्यावर कायमस्वरूपी मंडप उभारणीच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थानच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले.

देहली महामार्ग रिकामा करा !  

येथील सिंघू सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या विरोधात येथील स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढत निदर्शने केली. त्यांनी ‘देहली महामार्ग मोकळा करा’, अशी मागणी केली. गेल्या २ मासांपासून शेतकरी येथे ठाण मांडून आहेत.

इंदिरा गांधींनी भारताला धर्मनिरपेक्ष बनवण्याच्या अट्टाहासापोटी ४२ व्या घटना दुरुस्तीद्वारे राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेतच पालट केला होता

इंदिरा गांधींनी ४२ व्या घटना दुरुस्तीत ‘सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक’ याऐवजी ‘सार्वभौम, समाजवादी, धर्मातीत लोकशाही गणराज्य’ अशी शब्दयोजना केली.’