पणजी, २८ जानेवारी (वार्ता.) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मागण्या मान्य करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांनी येथील आझाद मैदानात चालू केलेले आंदोलन अखेर २८ जानेवारी या दिवशी मागे घेतले. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांतील सदस्याला सरकारी नोकरी देण्याच्या मागणीवरून स्वातंत्र्यसैनिकांच्या अनेक कुटुंबियांनी २२ जानेवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषण चालू केले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वी स्वातंत्र्यसैनिकांच्या २३ मुलांना फेब्रुवारीपर्यंत सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.