पणजी, २८ जानेवारी (वार्ता.) – विरोधी सदस्यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर गोवा विधानसभेत गोवा लोकायुक्त (दुरुस्ती) विधेयक, २०२१ संमत झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले होते.
या वेळी विरोधकांनी आरोप केला की, लोकायुक्त दुरुस्ती विधेयकांमुळे लोकायुक्तांचे अधिकार न्यून होणार आहेत. हे विधेयक संमत करण्याऐवजी ते सिलेक्ट समितीला पाठवावे, अशी विरोधकांनी मागणी केली; मात्र विरोधकांची मागणी धुडकावून विधानसभेत २३ विरुद्ध ७ मतांनी हे विधेयक संमत करण्यात आले.