वेल्लोर (तमिळनाडू) येथे शिष्यवृत्ती देण्याच्या नावाखाली लोकांना लुटणार्‍या पाद्रयाला अटक

पाद्रयांच्या गुन्हेगारी वृत्तीच्या विरोधात भारतातील प्रसारमाध्यमे नेहमीच मौन बाळगतात; मात्र हिंदूंच्या संतांच्या विरोधातील खोट्या आरोपांना भरभरून प्रसिद्धी देतात, हे लक्षात घ्या !

काँग्रेसचे नेते प्रतापसिंह राणे आणि त्यांच्या पत्नी कोरोनाबाधित

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांचे वडील तथा पर्ये मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे आणि त्यांच्या पत्नी विजयादेवी राणे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्या दोघांनाही गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून धर्मांतर करणार्‍या धर्मांध तरुणाला अटक

लव्ह जिहादविरोधी कायदा केल्यानंतरही अशा घटना घडत आहेत, त्यामुळे आता अशा प्रकरणांत लवकरात लवकर खटला चालवून आरोपींना कठोर शिक्षा होण्यास प्रारंभ झाला पाहिजे !

आगामी विधानसभा निवडणूक भाजप सहज जिंकणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सिद्ध झाला आहे. राज्यातील सर्व ४० मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांसाठी मेळावे घेतले जाणार आहेत. आगामी निवडणुकीनंतर ‘गोमंतकियांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्‍वास ठेवला’, असे चित्र दिसेल.’’

उत्तरप्रदेशात १० वीच्या विद्यार्थ्याकडून वर्गातील बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून मित्राची गोळ्या झाडून हत्या

विद्यार्थ्यांना लहानपणापासून साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! याला स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! हिंदु राष्ट्रात विद्यार्थ्यांना साधना शिकवून धर्माचरण करण्यास सांगितले जाईल !

महाराष्ट्र सरकार विसर्जित करण्यासाठी आखाडा परिषद राष्ट्रपतींना निवेदन देणार

अखिल भारतीय आखाडा परिषदेने राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार विसर्जित करून तेथे पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. साधू-संतांच्या प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे.

गोव्यातही घेतली कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम

पणजी येथील नागरी आरोग्य केंद्र, हळदोणा आणि खोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच ‘हेल्थ वे रुग्णालय’ या खासगी रुग्णालयात एकूण २५ आरोग्य कर्मचार्‍यांना ‘डमी’ कोविड लस देण्यात आली.

भ्रमणभाष सुविधा सुधारण्यासाठी २०० भ्रमणभाष मनोरे उभारण्याचा शासनाचा प्रस्ताव

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘भ्रमणभाष मनोरे उभारल्याने विद्यार्थी, ‘आयटी’ व्यावसायिक, ‘टॅक स्टॉर्टअप’ आदी समाजाच्या विविध घटकांना लाभ होणार आहे.’’

या घटना रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्र हवे !

राजमुंद्री (आंध्रप्रदेश) येथील विघ्नेश्‍वर मंदिरामध्ये भगवान श्री सुब्रह्मण्येश्‍वर स्वामी यांची मूर्ती अज्ञातांकडून फोडण्यात आली. राज्यात गेल्या १९ मासांमध्ये १२० मंदिरांवर आक्रमणाच्या घटना घडल्या आहेत.

कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कारांची घोषणा

‘व्याधकार ग.म. भैय्यासाहेब वालावलकर जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार’ जिल्हा पत्रकार संघाचे सचिव तथा दैनिक कोकणसादचे उमेश तोरसकर, ‘छायाचित्र पुरस्कार’ मालवण येथील समीर म्हाडगुत, ‘कै. वसंत दळवी स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार’ ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चे पणदूर प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांना घोषित करण्यात आला आहे.