उमेश तोरसकर, समीर म्हाडगुत, गुरुप्रसाद दळवी यांची निवड

कुडाळ – कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणार्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ‘व्याधकार ग.म. भैय्यासाहेब वालावलकर जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार’ जिल्हा पत्रकार संघाचे सचिव तथा दैनिक कोकणसादचे उमेश तोरसकर, ‘छायाचित्र पुरस्कार’ मालवण येथील समीर म्हाडगुत, ‘कै. वसंत दळवी स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार’ ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चे पणदूर प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांना घोषित करण्यात आला आहे.
कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने प्रतिवर्षी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना पुरस्कार दिले जातात. या अनुषंगाने पुरस्कार वितरण सोहळा आणि नियोजनाची बैठक येथील एम्.आय.डी.सी. विश्रामगृहात कुडाळ तालुका पत्रकार समिती अध्यक्ष विजय पालकर आणि जिल्हा पत्रकारसंघाचे सचिव उमेश तोरसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या वेळी खजिनदार अजय सावंत, उपाध्यक्ष आनंद मर्गज, नीलेश तेंडोलकर, दीपक तारी आदी उपस्थित होते. या पुरस्काराचे वितरण १६ फेब्रुवारीला भैय्यासाहेब वालावलकर यांच्या स्मृतीदिनी सकाळी १०.३० वाजता माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या पिंगुळी येथील ‘एकांत रिसॉर्ट’मध्ये होणार आहे.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !