वेल्लोर (तमिळनाडू) येथे शिष्यवृत्ती देण्याच्या नावाखाली लोकांना लुटणार्‍या पाद्रयाला अटक

पाद्रयांच्या गुन्हेगारी वृत्तीच्या विरोधात भारतातील प्रसारमाध्यमे नेहमीच मौन बाळगतात; मात्र हिंदूंच्या संतांच्या विरोधातील खोट्या आरोपांना भरभरून प्रसिद्धी देतात, हे लक्षात घ्या !

व्हिक्टर जेसुदासन

वेल्लोर (तमिळनाडू) – मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून पैसे चोरल्याच्या आरोपाखाली येथील व्हिक्टर जेसुदासन या पाद्रयाला अटक करण्यात आली आहे. त्याने कांगेनल्लूर येथील मजूर आणि अनेक लोकांचे पैसे हडप केले. तो २ लाख २७ सहस्र रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातही सहभागी आहे.

१. कुमार नावाच्या मजुराला त्याची दोन मुले आणि एक मुलगी यांच्या शिक्षणासाठी पैशांची आवश्यकता होती. त्याला माहिती मिळाली की, जेसुदासन याने चालवलेला ट्रस्ट मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देत आहे.

२. कुमार याने जेसुदासन याची भेट घेतली आणि साहाय्य मागितले. शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जेसुदासन याने कुमार याला २० सहस्र रुपये जमा करण्यास सांगितले. कुमार याने ती रक्कम त्याला दिली. तथापि बरेच दिवसांनंतरही कुमार याला पाद्रयाकडून शिष्यवृत्तीचे पैसे मिळाले नाहीत. जेव्हा त्याने पाद्रयाला पैशांविषयी विचारले, तेव्हा त्याने कुमार याला धनादेश दिला.

३. कुमार याने धनादेश बँकेत नेला असता पाद्रयाच्या खात्यात रकम शिल्लक नसल्याने धानदेश परत आला. जेव्हा कुमार याने पाद्री जेसुदासनची भेट घेऊन पैशांची मागणी केली, तेव्हा जेसुदासनने कुमारला शिवीगाळ केली आणि धमकी दिली.

४. कुमारने पोलीस महानिरीक्षकांकडे जेसुदासन याच्या विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी अन्वेषण प्रारंभ केले. त्यात जेसुदासन याने अनेकांना फसवले असल्याचे आढळून आले.

५. जेसुदासन याने अशीच आश्‍वासने देऊन कंगेनल्लूरमधील अनुमाने १० लोकांकडून पैसे घेतले होते. या लोकांना त्याने घर विकत घ्यायचे, वृद्धापकाळात भत्ता, शिष्यवृत्ती, शिवणकामाची यंत्रणा, अपंगांसाठी वाहने वगैरे देण्याचे आश्‍वासन दिले.