दुष्ट व्यक्तीविषयी शास्त्रवचन
जसे थकलेला हत्तींचा राजा सावलीसाठी वृक्षाचा आश्रय घेतो आणि विश्राम झाल्यानंतर त्याच वृक्षाचा नाश करतो, तसेच नीच (दुष्ट) मनुष्य स्वतःला आश्रय देणार्याचा सुद्धा (कृतघ्नपणे) नाश करतो.
जसे थकलेला हत्तींचा राजा सावलीसाठी वृक्षाचा आश्रय घेतो आणि विश्राम झाल्यानंतर त्याच वृक्षाचा नाश करतो, तसेच नीच (दुष्ट) मनुष्य स्वतःला आश्रय देणार्याचा सुद्धा (कृतघ्नपणे) नाश करतो.
बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम २३ मध्ये कोणत्याही प्रसारमाध्यमाच्या वृत्तामध्ये बालकाची ओळख उघड होईल, असा तपशील उघड होणार नाही, असे नमूद असल्याचे अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
युवतींमधील शौर्य जागृत करणे, जीवनातील साधनेचे आणि काळानुसार स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचे महत्त्व बिंबवणे या दृष्टीकोनातून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन शौर्यजागृती वर्ग’ आयोजित करण्यात आला होता.
कुडाळ शहरातील गांधी चौक येथे एस्.टी.च्या नूतन बसस्थानकाचे उद्घाटन परिवहनमंत्री परब यांच्या हस्ते ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात आले.
सुप्रसिद्ध संवादिनी (हार्मोनियम) वादक विष्णुबुवा फडके (वय ९८ वर्षे) यांना ३० डिसेंबर या दिवशी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी देवाज्ञा झाली. ते सनातनच्या साधिका सौ. सुविधा फडके यांचे सासरे होत.
सनातनच्या साधिका सौ. भारती बाडगी यांच्या आई श्रीमती मंगला यशवंत फडके (वय ९१ वर्षे) (आध्यात्मिक पातळी – ६१ टक्के) यांचे २८ डिसेंबर या दिवशी रात्री ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
सध्या गोव्यात देशी पर्यटक मोठ्या संख्येने आलेले असल्याने पर्यटन व्यावसायिक आनंदात आहेत; परंतु गोवा पोलिसांना मात्र एका वेगळ्या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. गोव्यात मजा करण्यासाठी येणारे देशी पर्यटक स्वतःजवळ अमली पदार्थ बाळगतात, असे पोलिसांना आढळून आले आहे.
दमोह (मध्यप्रदेश) येथे गोवंशाची तस्करी रोखण्याचा प्रयत्न केल्यावर धर्मांध कसायांनी दोघा हिंदूंवर केलेल्या आक्रमणात अजय मुडा हे शिक्षक ठार झाले.
अयोध्येत मोठ्या प्रमाणात राममंदिराची उभारणी होणार आहे. या संदर्भातील बैठका गोव्यात चालू झाल्या आहेत. याविषयीची एक महत्त्वाची बैठक सत्तरी तालुक्यात नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत राममंदिरासाठी निधी समर्पण अभियानावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
ईश्वर हा विषय सर्वांना समजावा, अनुभवता यावा, यासाठी या सगुण साकार रूपात देव अवतरित झाले, असे श्रीदत्त पद्मनाभ पिठाचे पिठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी मार्गदर्शनपर आशीर्वचन केले.