‘संत-ताई, पू. अश्‍विनीताई यांच्या रूपात प्रत्यक्ष भगवंतच कसा वेळोवेळी साहाय्य करत आहे’, हे सांगणारे एका भावाचे हृद्गत !

हे भगवंता, माझी काहीच साधना नसतांना माझ्या वाईट काळात पू. ताईच्या रूपातून माझ्यासाठी तूच धावून आलास. माझे वाया जाणारे आयुष्य स्थिर केलेस, मला सांभाळले आणि सावरलेस.

पू. नीलेश सिंगबाळ रामनाथी आश्रमात गेल्यानंतर वाराणसी सेवाकेंद्रातील त्यांच्या कक्षातून साधकांना सुगंध येऊन चैतन्य प्रक्षेपित होणे

‘पू. नीलेश सिंगबाळ काही कारणास्तव रामनाथी आश्रमात गेले. ३०.१०.२०२० या दिवशी त्यांचे वास्तव्य असलेल्या वाराणसी सेवाकेंद्रातील कक्षात गेल्यावर मला सुगंध आला.

६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्वाती शिंदे यांना बालसंत पू. वामन राजंदेकर यांच्या संदर्भात आलेली अनुभूती !

पू. वामन मला (मनातूनच) सांगत होते, ‘अगं, संतांना स्थुलाचे बंधन नसते. एखाद्याच्या मनातील भाव, तळमळ जाणून ते ती कसेही करून पूर्ण करतात.’’ त्यामुळे ‘स्थुलातून मी तिकडे येण्याची आवश्यकता नाही. मी सूक्ष्मातून तुझी इच्छा पूर्ण केली आहे.

सनातनच्या रामनाथी आश्रमात आल्यावर विविध यज्ञ आणि याग यांच्या वेळी उपायांसाठी बसल्यावर आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात यज्ञ याग यांना नामजपादी उपायांना बसण्याची संधी मिळते. तेव्हा परात्पर गुरुमाऊलीप्रती अपार कृतज्ञता वाटून मन भरून येते. गुरुमाऊली या यज्ञाला उपस्थित रहाण्याची संधी देत आहेत, यासाठी ‘कृतज्ञता’ हा शब्दसुद्धा अपुरा आहे.

गुरुमाऊली, तुम्ही जिंकलात, आम्ही हरलो ।

प्रत्येक साधकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले ।
गुरुमाऊली, कितीही जन्म घेतले, तरी गुरुऋण कसे फेडू आपले ॥

कु. नंदा नाईक यांना यज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती

६.५.२०१८ या दिवशीच्या  यज्ञाला मी आश्रमात उपस्थित होते. तेव्हा मला यज्ञातून एक देवी बाहेर येतांना दिसली. तो यज्ञ श्री मातंगीदेवीचा होता. मातंगीदेवीला पोपटी रंग आवडतो आणि यज्ञातून बाहेर आलेल्या देवीच्या साडीचा रंगही पोपटी होता.

प.पू. भक्तराज महाराज रचित भजने ऐकतांना अनुभवलेली भावावस्था आणि रात्री नामजप होत असल्याने मिळत असलेला आनंद

कार्तिक कृष्ण पक्ष नवमी (९.१२.२०२०) या दिवशी असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या महानिर्वाण उत्सवाच्या निमित्ताने…

चि. संदीप शिंदे यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

समष्टी प्रकृतीचे आणि सेवेशी संबंधित अनेक कौशल्ये आत्मसात करणारे श्री. संदीप शिंदे !

चि. संदीप शिंदे आणि चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांचा विवाह सुनिश्‍चित झाल्याची आनंदवार्ता ऐकल्यावर कवितांच्या माध्यमातून त्यांच्या सहसाधकांचा झालेला संवाद

स्वाती नक्षत्रातील पावसाने शिंपल्यात होतो मोती ।
संदीप-स्वाती हे दोन मोती विराजू दे श्रीविष्णूच्या मुकुटी । हीच प्रार्थना गुरुचरणी ॥

‘हिंदु राष्ट्राचा संसार करायचा आहे’, असे उच्च ध्येय ठेवणार्‍या सौ. वेदश्री हर्षद खानविलकर अन् शांत, प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाचे श्री. हर्षद खानविलकर !

श्री. हर्षद आणि सौ. वेदश्री खानविलकर यांना विवाहाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !