सनातनच्या रामनाथी आश्रमात आल्यावर विविध यज्ञ आणि याग यांच्या वेळी उपायांसाठी बसल्यावर आलेल्या अनुभूती

‘सौ. नंदिनी नरेंद्र सुर्वे यांनी लिहिलेल्या विविध यज्ञ आणि याग यांच्या वेळी आलेल्या चांगल्या आणि वाईट अनुभूती चांगल्या लिहिल्या आहेत. इतर साधकांनीही अशाच लिहून पाठवाव्यात. त्यामुळे या विषयांचा अभ्यास करण्यास साहाय्य होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
सौ. नंदिनी सुर्वे

१. श्री कालभैरव यज्ञ

‘यज्ञ चालू होण्यापूर्वी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्री. वझेगुरुजी यज्ञस्थळी बसले असतांनाचे दृश्य पहातांना ‘हा यज्ञ आता होत नसून मी त्रेतायुगातील दृश्य पहात आहे’, असे जाणवले. एक निर्वात पोकळी जाणवत होती. काही सेकंदासाठी मन पूर्णपणे निर्विचार झाले.

२. श्रीयंत्र पूजा

श्रीयंत्र पूजा करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई देवी स्वरूपात दिसत होत्या. ‘एक देवी दुसर्‍या देवीची पूजा करत आहे. नंतर देवी स्वतःचीच पूजा करत आहे’, असे जाणवले. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई अन् देवी एकरूप झाल्या आहेत’, असे जाणवले.

३. छिन्नमस्ता देवी याग

यज्ञात पूर्णाहुती झाल्यावर प्रार्थना केल्यावर माझे अंग गरम झाले होते. पाय पुष्कळ दुखत होते आणि हातांची बोटे जवळ येत नव्हती; पण ‘कुष्मांड बली’ दिल्यावर चांगले वाटले अन् त्रास उणावला.

४. सौरयाग

पूर्णाहुती होण्यापूर्वी आणि त्यानंतर चंदनाचा सुगंध येत होता.

५. श्रीराजमातंगी याग

अ. सकाळी अचानक ‘गाणे गावे’, असे वाटत होते. कर्नाटक येथील संत पू. देवबाबा यांचे स्मरण झाले.

आ. यज्ञ चालू असतांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या चरणांवर सूक्ष्मातून मस्तक ठेवल्यावर तिथे देवीचे मारक रूप प्रकट झाले आहे’, असे जाणवले.

६. श्री मृत्युंजय याग

‘याग चालू असतांना डाव्या बाजूने डोके जड झाले आणि दुखत होते; पण परात्पर गुरुदेव आल्यावर क्षणार्धात त्रास अल्प झाला. आरती करतांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईच्या ठिकाणी देवी पार्वतीच स्मितहास्य करत आहे’, असे जाणवले.

रामनाथी आश्रमात यज्ञ याग यांना नामजपादी उपायांना बसण्याची संधी मिळते. तेव्हा परात्पर गुरुमाऊलीप्रती अपार कृतज्ञता वाटून मन भरून येते. माझी पात्रता नसतांना गुरुमाऊली या यज्ञाला उपस्थित रहाण्याची संधी देत आहेत, यासाठी ‘कृतज्ञता’ हा शब्दसुद्धा अपुरा आहे.’

– सौ. नंदिनी नरेंद्र सुर्वे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक