‘९.१२.२०२० या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले आणि कु. स्वाती गायकवाड यांच्यातील काव्यमय संभाषण वाचल्यावर देवाने मला सुचवलेल्या काव्यपंक्ती येथे दिल्या आहेत.
स्वातीताईसारख्या सहस्रो साधकांना गुरुमाऊली आपणच घडवले, ।
तरीही सर्वांचे श्रेय मात्र साधकांना दिधले ॥ १ ॥
प्रत्येक साधकाला अध्यात्मातील ‘अ, आ, इ’ शिकवले ।
देवा, आपणच सर्व करूनही नामानिराळे राहिलात ॥ २ ॥
साधकांना चराचरात ईश्वर पहायला शिकवले; ।
परंतु गुरुराया, ‘तेहतीस कोटी देवता आपल्याच चरणांमध्ये आहेत’ ।
हे अनुभवायला दिलेत ॥ ३ ॥
प्रत्येक साधकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले ।
गुरुमाऊली, कितीही जन्म घेतले, तरी गुरुऋण कसे फेडू आपले ॥ ४ ॥
गुरुमाऊली, तुम्ही जिंकलात, आम्ही हरलो’ ॥ ५ ॥
– अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी, दापोली, रत्नागिरी. (९.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |