कु. नंदा नाईक यांना यज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ४.५.२०१८ ते ७.५.२०१८ या कालावधीत रामनाथी आश्रमात विविध यज्ञ झाले. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले
कु. नंदा नाईक

१. म्हापसा येथे राहून आश्रमातील यज्ञस्थळाच्या जवळील दृश्य दिसणे : ‘४.५.२०१८ या दिवशी रामनाथी आश्रमात यज्ञ चालू असतांना मी म्हापसा येथे बहिणीच्या घरी होते. तेथे मला इकडे जशी यज्ञाची मांडणी केली आहे, तसे दृश्य दिसत होते. तसेच यज्ञस्थळी जो फलक लावलेला होता, तो मला दिसला होता. आश्रमात आल्यावर माझ्या लक्षात आले की, मी म्हापसा येथे जसे दृश्य पाहिले होते, तशीच सर्व मांडणी यज्ञाची केली होती.

२. श्री मातंगीदेवी सोडत असलेले पिवळे वलय प्रत्येक साधक आणि प्रत्येक आश्रमात जात असल्याचे दिसणे : ६.५.२०१८ या दिवशीच्या  यज्ञाला मी आश्रमात उपस्थित होते. तेव्हा मला यज्ञातून एक देवी बाहेर येतांना दिसली. तो यज्ञ श्री मातंगीदेवीचा होता. मातंगीदेवीला पोपटी रंग आवडतो आणि यज्ञातून बाहेर आलेल्या देवीच्या साडीचा रंगही पोपटी होता. ‘तिने आपले दोन हात पुढे केले होते आणि यज्ञात अर्पण होणारी सर्व सामग्री आपल्या तोडांत घेत आहे’, असे दृश्य मला दिसले. जेव्हा ती सर्व घेत होती, तेव्हा तिच्या माध्यमातून चारही दिशांना पिवळे वलय सुटत होते आणि ते ‘पिवळे वलय प्रत्येक साधक आणि प्रत्येक आश्रमात जात आहे’, असे दिसत होते.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक