परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कोणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांसमवेत दुरावा, भांडण होत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

महान तपस्व्यांवरील श्रद्धेमुळे काळजी नसणे

  ‘तब्बेतीला अधिक त्रास देऊ नको. तुझी विश्रांती नसणार, धावाधाव असणार, म्हणजे बेट्यावर (गुरुजींवर) आलेले एक प्रकारचे ओझेच. त्याच्यावर आलेले ओझे, म्हणजे माझे ओझे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने संशोधन करावे लागत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना विज्ञानाचा कितीही अहंकार असला, तरी त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांना छोट्यातील छोटा एकपेशीय प्राणीच काय; पण बाह्य गोष्टींच्या वापराविना दगडाचा एक कणही बनवता येत नाही. याउलट ईश्‍वराने लाखो पेशी असलेला मानव आणि अनंत कोटी ब्रह्मांडे बनवली आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संतांनाही रज-तम वातावरणापासून दूर राहणे पसंत !

‘मी गुरुवारी का बोललो नाही ? दूषित हवा विरळ होऊन शुद्ध हवेचा प्रवेश झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रवेश करणे बरे असते, नाहीतर आपले मनही विटाळून जाते. संत शुद्ध हवेवर जगतात आणि वासनेच्या लढाईपासून दूर असतात. कुठल्याही तर्‍हेचे विकल्प होऊ न देण्यासाठी त्यांनाही तशी काळजी घ्यावी लागते. . . . – प.पू. आबा उपाध्ये

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे सर्वश्रेष्ठत्व !

‘जगातील वैद्य, अभियंता, अधिवक्ता, वास्तूविशारद इत्यादी विविध विषयांतील तज्ञ, तसेच गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान इत्यादी एकही विषय दुसर्‍या विषयासंदर्भात एक वाक्य सांगू शकत नाहीत. फक्त अध्यात्म हा एकच विषय विश्‍वातील सर्व विषयांशी संबंधित . . . परिपूर्ण माहिती देऊ शकतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आशीर्वादाच्या जोडीला प्रामाणिक अभ्यास हवा !

‘अभ्यास केल्यानंतर आशीर्वाद द्यावयाचा असतो. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास प्रामाणिकपणाने केल्याने बुद्धीदेवता जागृत होते. तिला ते आवाहनच असतेे. पुढे राहिलेल्या प्रश्‍नपेपरांना आशीर्वादाची थोडी आवश्यकता आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘जगातील इतर सर्व विषयांचे ज्ञान अहंकार वाढवते, तर अध्यात्म हा एकच विषय असा आहे की, जो अहंकार अल्प करण्यास साहाय्य करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले           

अहंकारामुळे देवासाठी अश्रू ढाळता न येणे !

‘‘रडणे ही मोठी शक्ती आहे. देवासाठी जे रडतात, ते धन्य आहेत. अहंकारी माणूस रडत नाही. अहंकार अश्रू ढाळू देत नाही. अहंकार्‍याच्या वार्‍यालाही भाव उभा राहात नाही. भक्तीचा त्याला कधीच गंध येत नाही.’