राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि महाविकास आघाडी दोघांचे यशाचे दावे !

सर्वाधिक ग्रामपंचायतींत भाजपचा विजय झाल्याचा दावा भाजपने, तर ८० टक्के ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकल्याचा दावा त्यांनी केला आहे. १९ जानेवारी या दिवशी निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट होईल.

(म्हणे) ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये द्वेष पसरवला जातो ! – नसीरुद्दीन शाह

मशिदींमधून लव्ह जिहादचे फतवे निघतात, धर्मांध युवकांना पैसा पुरवला जातो, याची कबुली शेकडो प्रकरणांत युवकांनी पोलीस ठाण्यांत दिलेली आहे, हे शाह यांना माहीत नाही काय ?

भूमीच्या मालकीसाठी सत्तरीत एक दिवस उठाव होणार !  विश्‍वेश परब, युवा आंदोलक, मेळावली

भूमीच्या मालकीसाठी सत्तरीत एक दिवस उठाव होणार आहे, असे विधान मेळावली येथील आयआयटी विरोधातील युवा आंदोलक श्री. विश्‍वेश परब यांनी केले. ‘भारत माता की जय’ संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘मेळावली वाचवा लोकशाही वाचवा’, या विषयावर ते बोलत होते.

‘ख्रिस्ती गावां’चा धोका !

हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींना लाथ मारणार्‍या प्रवीण चक्रवर्ती या पाद्य्राला आंध्रप्रदेश पोलिसांनी अटक केली. या पाद्य्राने राज्यात ६९९ ‘ख्रिस्त व्हिलेज’ नावाची गावेही बनवली आहेत. या पाद्य्राचे नाव ‘प्रवीण चक्रवर्ती’ आहे. याचा अर्थ कधी तरी प्रवीण चक्रवर्ती किंवा त्याचे पूर्वज यांनी धर्मांतर केले असावे.

७० पैकी ४५ ग्रामपंचायती भाजपकडे, तर शिवसेनेची २१ ग्रामपंचायतींवर सत्ता

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाली होती. त्याचा निकाल १८ जानेवारीला घोषित झाला. या वेळी ७० पैकी ४५ ग्रामपंचायतींवर भाजप पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेला २१ ग्रामपंचायतींत यश मिळाले.

ममता बॅनर्जी ‘इस्लामी आतंकवादी’ ! – उत्तरप्रदेशातील भाजपचे मंत्री आनंद स्वरूप शुक्ला

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांना भारतियतेवर विश्‍वास नाही. त्या ‘इस्लामी आतंकवादी’ आहेत. त्यांनी बंगालमध्ये हिंदु देवतांना अपमानित करण्याचे आणि मंदिरे पाडण्याचे काम केले आहे.

मालवणी ‘इस्लामी’ होणार ?

भारतात धर्मांधांकडून हिंदू मार खात आहेत. यात हिंदूंची निष्क्रीयता कारणीभूत असली, तरी त्याहून पोलिसांची निष्क्रीयता अधिक गंभीर आहे.

शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर मोर्च्याच्या अनुमतीविषयी पोलिसांनीच निर्णय घ्यावा  ! – सर्वोच्च न्यायालय

शेतकर्‍यांचा ट्रॅक्टर मोर्चा हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न असून पोलिसांनीच याविषयी निर्णय घ्यावा. केंद्र सरकारलाही परिस्थिती कशी हाताळावी ?, याचे पूर्ण अधिकार आहेत.

शीख पंथाला हिंदु धर्मापासून वेगळे करू पहाणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

शीख पंथाला हिंदु धर्मापासून वेगळे करू पहाणार्‍यांनी हे जाणून घेतले पाहिजे की, श्रीराममंदिराच्या आंदोलनात पहिली ‘एफ्.आय.आर्.’ हिंदूंविरुद्ध नव्हे, तर शिखांविरुद्ध झाली होती. यावरून ‘शीख हे सनातन हिंदु धर्माचे अभिन्न अंग आणि धर्मरक्षक योद्धा आहेत’, हे सिद्ध होते.

मडगाव येथील स्वामी विवेकानंद केंद्र खुले करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या गोवा भेटीच्या वेळी भेट दिलेल्या मडगाव येथील ‘दामोदर साल’ या ठिकाणाला भेट देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.