यंदाच्या अर्थसंकल्पात पुणेकरांच्या आरोग्यासाठी १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद !

स्थायी समितीने महापालिकेच्या निधीतून आणि खासगी भागीदारीतून शहरातील आरोग्यव्यवस्था सशक्त करण्यासाठी भरीव तरतूद केली आहे.

उल्हासनगर येथे पोलिसाला भर रस्त्यात शिवीगाळ करणार्‍या २ भावांना न्यायालयीन कोठडी

पोलिसांनी आशिष आणि आकाश त्रिपाठी या दोघा भावांविरोधात गुन्हा नोंद केला होता. त्यांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

भारतमातेला हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निर्धार करा ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंह, राजगुरु यांचे नाव घेतल्यावर आपल्या मनात निर्माण होते ते खरे ‘शौर्य’ ! त्यांचा आदर्श घेऊन हिंदूंनी संघटित होऊन भारतमातेला हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निर्धार करावा.

गणेशोत्सवामध्ये गणेशभक्तांना शाडू मातीच्या मूर्ती उपलब्ध करून द्याव्यात ! – हिंदु जनजागृती समितीची निवेदनाच्या माध्यमातून मागणी

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम हौद बांधून त्यामध्ये मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले जाते,..

प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदीच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करू ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

कुंभार समाजाचा संपूर्ण व्यवसाय, माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर अवलंबून आहे; परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे कुंभार समाजाची अतोनात हानी होत आहे.

सर्कोझी आणि व्यवस्था !

​भारत महासत्तेच्या दिशेने पावले टाकत आहे. यासाठी भारतात बोकाळलेला भ्रष्टाचार हा मोठा अडसर आहे. विकसित देश तो निपटण्यासाठी काय करतात, याचा अभ्यास हवा आणि त्या अभ्यासातून पुढे आलेल्या सूत्रांची कार्यवाही करण्यासाठी धडाडीही दाखवायला हवी. असे केले, तरच भ्रष्ट राजकारण्यांवर वचक बसेल.

कोरोना महामारी काळात खरेदी केलेल्या साहित्यात ३५ कोटी रुपयांचा घोटाळा

कोरोना महामारीतही भ्रष्टाचार करणारे भ्रष्टाचारात किती आकंठ बुडालेले असतील, याची कल्पना येते. अशांची पाळेमुळे खणून काढून त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.

‘कोरोना’ विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडणार्‍यांनी, तसेच सर्दी, खोकला किंवा ताप ही लक्षणे असलेल्यांनी पुढील कृती कराव्यात !

स्वतःतील प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी सर्वांनी संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.

मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करूया ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

​‘सरकार अधिसूचना देऊन त्या आधारे ठराव करून विशिष्ट मंदिरे कधीही कह्यात घेऊ शकते. त्यामुळे आपल्या मंदिरांवर ही टांगती तलवार आहेच.

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्थेच्या उत्पादनांच्या वेष्टनांवरील हनुमानाचे चित्र काढा !

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्थेच्या उत्पादनांच्या वेष्टनांवर हनुमानाचे चित्र मुद्रित केलेले आहे. या उत्पादनांचा वापर करून झाल्यावर ही उत्पादने कचर्‍यात, रस्त्यावर, तसेच अन्यत्र टाकली जातात.