‘कोरोना’ विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडणार्‍यांनी, तसेच सर्दी, खोकला किंवा ताप ही लक्षणे असलेल्यांनी पुढील कृती कराव्यात !

साधकांना सूचना, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे

‘देशभरात ‘कोरोना’ विषाणूचा पुन्हा झपाट्याने प्रसार होत आहे. या परिस्थितीमध्ये सर्वांनी गर्दीच्या ठिकाणी न जाणे, अनावश्यक प्रवास न करणे, सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर करणे, आदी सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्यांना अत्यावश्यक कारणांसाठी किंवा नोकरीच्या निमित्ताने प्रतिदिन बाहेर जावे लागते, त्यांनी आपल्याला सर्दी, खोकला किंवा ताप ही लक्षणे नसली, तरी प्रतिदिन २ वेळा प्रत्येकी ३ – ४ मिनिटांसाठी नाकावाटे वाफ घ्यावी.

ज्यांना सर्दी, खोकला किंवा ताप ही लक्षणे असतील, त्यांनी दिवसातून ३ – ४ वेळा वाफ घेणे आवश्यक आहे. गरम पाण्यात मीठ अन् थोडी हळद घालून दिवसातून ५ – ६ वेळा गुळण्या कराव्यात, तसेच वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे. शक्य असल्यास घरातील अन्य सदस्यांपासून स्वतःचे अलगीकरण करून घ्यावे.

स्वतःतील प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी सर्वांनी संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.’

– आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.