मुंबई, ३ मार्च – कुंभार समाजाचा संपूर्ण व्यवसाय, माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर अवलंबून आहे; परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे कुंभार समाजाची अतोनात हानी होत आहे. गेल्या २ वर्षांत महापूर आणि कोरोनामुळे कुंभार बांधवांवर कर्जाचा डोंगर झाला आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसवर घातलेली बंदी शासनाने उठवावी, या मागणीचे निवेदन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कुंभार समाजाच्या शिष्टमंडळाने राज्याचे नगरविकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सादर केले. या वेळी ‘प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी संदर्भात राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करू’, असे आश्वासन श्री. एकनाथ शिंदे यांनी दिले.