पुढील निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यावर नवीन सरकार ही भूमी परत घेईल !

‘कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची २ एकर भूमी अल्पसंख्यांक कल्याण विभागाला दिली. यावरून भाजपने काँग्रेसवर ‘भूमी जिहाद’ केल्याचा आरोप केला.

वर्ष २०१९ च्या खटल्याचा वर्ष २०२४ मध्ये म्हणजे ५ वर्षांनी निकाल लागणे हे सरकारला लज्जास्पद !

‘शाळेच्या बसमध्ये ४ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने बसचालक आणि साहाय्यक महिला यांना दोषी ठरवले आहे. चालकाला ५ वर्षे सश्रम कारावास, तर साहाय्यक महिलेला ८ मास कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

कारागृहात अमली पदार्थ सापडल्याच्या प्रकरणी प्रशासकीय अधिकार्‍यांना कारागृहात ठेवले पाहिजे !

‘भाग्यनगर अमली पदार्थविरोधी पथकाने फेब्रुवारी २०२४ मध्ये नायजेरियाचा अमली पदार्थ व्यावसायिक इवाला उडोका स्टँली याला कह्यात घेतले होते. चौकशीतून गोव्यातील कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांचा व्यवसाय चालू असल्याचे उघड झाले आहे.

ध्येयनिष्ठ दैनिक ‘सनातन प्रभात’चे २५ व्या वर्षात पदार्पण !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आवृत्तीला दिनांकानुसार २४ वर्षे पूर्ण होऊन आज (४ मार्च या दिवशी) दैनिक २५ व्या म्हणजे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.

हिंदूंच्या मोर्चाला अनुमती नाकारणार्‍या पोलिसांवर कारवाई करा !

‘मीरा-भाईंदर (जिल्हा पालघर) येथील पोलिसांनी भाजप आमदार श्री. टी. राजासिंह यांच्यावरील गुन्ह्यांचा संदर्भ देत सकल हिंदु समाजाच्या मोर्चाला अनुमती नाकारली होती.

शाकाहाराचे महत्त्व !

प्राण्यांना बुद्धी आणि विवेक नसतो. त्यामुळे मत्सर, संघर्ष, हिरावून घेणे, हे त्यांचे निसर्गदत्त गुण पर्यायाने मनुष्य स्वभावातही उतरत असतात.

भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होणे आवश्यक !

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ? त्यामुळे हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.’

सुखाची संकल्पना हीसुद्धा परकीय विचारांच्या प्रभावाखालीच !

‘वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र आपण खरेच स्वतःच्या तंत्राने मार्गक्रमण करतो आहोत का ? हा मोठा प्रश्न आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या अनेक पिढ्यांना आपण पाश्चात्त्यांच्या ओंजळीतून पाणी प्यायला शिकवले.

संस्कृत भाषेचे सौंदर्य

विषयभोगासाठी, भयामुळे, लोभामुळे आणि जीव वाचवण्यासाठीसुद्धा धर्म सोडू नये; कारण धर्म नित्य आहे. सुखदुःखे अनित्य आहेत.