‘भाग्यनगर अमली पदार्थविरोधी पथकाने फेब्रुवारी २०२४ मध्ये नायजेरियाचा अमली पदार्थ व्यावसायिक इवाला उडोका स्टँली याला कह्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून गोव्यातील कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांचा व्यवसाय चालू असल्याचे उघड झाले आहे. स्टँली याने अन्वेषणाच्या वेळी सांगितले की, गोव्यातील कोलवाळ कारागृह या सर्व व्यवहारासाठी प्रमुख केंद्र होते. कोलवाळ कारागृहातील बंदीवान ओक्रा आणि फैजल हे भ्रमणभाषच्या माध्यमातून विदेशातून अमली पदार्थ मागवत होते. हा माल आल्यानंतर ‘सौरव’ नावाची व्यक्ती तो माल अपेक्षित स्थळी पोचवत होता.’ (२.३.२०२४)