‘शाळेच्या बसमध्ये ४ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने बसचालक आणि साहाय्यक महिला यांना दोषी ठरवले आहे. चालकाला ५ वर्षे सश्रम कारावास, तर साहाय्यक महिलेला ८ मास कारावासाची शिक्षा सुनावली आहे. डेनिस लुईस (वय ६३ वर्षे) हा चालक असून त्याची मुलगी जेनोविया मथाईस (वय ३२ वर्षे) ही साहाय्यक आहे. ही घटना वर्ष २०१९ मध्ये मीरा रोड येथे घडली होती. डेनिसने लैंगिक अत्याचार केल्याने त्याला अटक करण्यात आली होती. सत्य ठाऊक असूनही मथाईस हिने ते लपवून त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता; पण काही दिवसांनी पोलिसांनी तिलाही अटक केली होती.’ (३.३.२०२४)