प्रत्यक्ष अन्नसेवनात शाकाहार आणि मांसाहार असे २ प्रकार असतात. अर्थात् अन्नाची शुद्धता, सात्त्विकता वगैरे हे सर्व मुद्दे केवळ शाकाहारी जेवणाविषयीच विचारात घेता येतील. मांसाहाराचे विचारतत्त्व पूर्णतः वेगळे आणि विरोधी असतात. भारतात शाकाहाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचसमवेत जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव शाकाहारी देश आहे. जो एवढ्या मोठ्या प्रमाणात शाकाहाराला प्राधान्य देतो आणि मांसाहार वर्ज्य मानतो.
अध्यात्माच्या दृष्टीकोनातून विचार केला, तर त्यातून कळते की, मांसाहार म्हणजे अभक्ष भक्षण. जे भक्षण्यास योग्य नाही ते. हे अयोग्य का आहे ? तर त्याचे साधे उत्तर, म्हणजे आपण ज्या प्राण्याचे मांस खाऊ त्या प्राण्याचे स्वभाव-गुणधर्म आपल्यात उतरतात. थोडक्यात आपल्या वृत्तीत फरक पडतो. तमोगुणी अथवा रजोगुणी प्रवृत्ती जोपासली जाते. प्राण्यांना बुद्धी आणि विवेक नसतो. त्यामुळे मत्सर, संघर्ष, हिरावून घेणे, हे त्यांचे निसर्गदत्त गुण पर्यायाने मनुष्य स्वभावातही उतरत असतात.
– एक धर्मप्रेमी