बंदी असलेल्या ‘एच्.टी.बी.टी.’ कापूस बियाण्याची महाराष्ट्रात विक्री; २६ ठिकाणी गुन्हे नोंद !

खरीप हंगामाच्या तोंडावर महाराष्ट्रात केंद्र सरकारने बंदी घातलेल्या ‘एच्.टी.बी.टी.’ या कापूस बियाण्याची विक्री होत असल्याचा प्रकार आढळून आला आहे.

अखेर सांगली येथील वटवृक्षाच्या कट्ट्यावरील ‘मॉडर्न चिकन ६५’चे अनधिकृत खोके महापालिकेने हटवले !

वटपौर्णिमेला शेकडो महिलांकडून वटवृक्षाची मनोभावे पूजा ! हिंदुत्वनिष्ठांनी पाठपुरावा केला नसता, तर हा वटवृक्ष मुक्त झालाच नसता !

श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथासह साहित्याला चांदीची झळाळी !

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीतील २७ व्यापारी आणि कारागीर यांनी पालखी रथासह साहित्यालाही झळाळी दिली आहे. हे सर्वजण सद्गुरुदास गोपाळकृष्ण पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी आहेत.

विशाळगडाच्या मुक्तीसाठी न्यायालयात यशस्वी लढाई लढू ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे रायगडावर आलेल्या विशाळगडप्रेमींना सरकार निराश होऊ देणार नाही. विशाळगडाच्या मुक्तीसाठी न्यायालयात यशस्वी लढाई लढू, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तिथीनुसार राज्याभिषेकदिन उत्साहात !

प्रतिवर्षाप्रमाणे तिथीनुसार म्हणजे ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना निमंत्रण !

येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांनी भेटून १२ व्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च निमंत्रण दिले.

ठाणे येथे विद्यार्थ्यांना मनसेकडून वह्यांचे वाटप !

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना ठाणे येथील वर्तकनगर भागात वह्यांचे वाटप करण्यात आले. मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतच्या मुला-मुलींनी घेतला.

मांडवे (जिल्हा सातारा) येथील सैनिक ज्ञानेश्वर खाडे हुतात्मा !

खटाव तालुक्यातील मांडवे येथील वीर सैनिक ज्ञानेश्वर हनुमंत खाडे (वय २१ वर्षे) यांना जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे वीरमरण आले. खटाव तालुक्यातील मांडवे गावचे पैलवान हनुमंत खाडे यांचे ते सुपुत्र होते.

 रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस !

प्रत्येक पावसाळ्यात परशुराम घाटात दरड कोसळण्याची घटना घडते. आता घाटात नवीन बांधलेली संरक्षक भिंतच कोसळल्याने ठेकेदार आस्थापनाने निकृष्ट काम केले नाही ना ? याचीही चौकशी होणे आवश्यक आहे !

राज्यातील ९०० शासकीय धान्य गोदामांचे होणार खासगी लेखापरीक्षण !

राज्यातील ९०० शासकीय धान्य गोदामांची मागणी, पुरवठा आणि गोदामातील शिल्लक साठा यांचे यापुढे खासगी लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षण केले जाणार आहे.