पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारलेल्या गोमंतकियांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याची शक्यता

गोव्यात ७ मे या दिवशी झालेल्या उत्तर आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान झाले. या वेळी पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारलेल्या काही गोमंतकियांनी मतदान केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धार्मिक भावना दुखावणार्‍या कुंकळ्ळी (गोवा) येथील श्रेया धारगळकर हिच्या विधानाचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून निषेध

धार्मिक भावना दुखावण्याचे धाडस कुणीही करू नये, यासाठी या प्रकरणी कडक कारवाई केली जाणार !

छत्रपती संभाजीनगर येथे पत्नीला भ्रमणभाषवर तलाक देणार्‍या पतीसह ७ जणांवर गुन्हा नोंद !

घर घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आण, या मागणीसाठी विवाहितेचा छळ चालू होता. सासर्‍यांना दूरभाष करून पतीने पत्नी रुखसाना सुफियान कुरेशी (२१ वर्षे) यांना तलाक दिल्याची घटना नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे घडली.

पालखीच्या पुणे मुक्कामात पोलिसांकडून अडवणूक झाल्यास पालखी दर्शनासाठी रस्त्यावरच ठेवू !

अन्य धर्मियांच्या नव्हे, तर केवळ हिंदूंच्याच धार्मिक गोष्टींत आडकाठी आणणारे पोलीस दुटप्पीच !

अमरावती येथे शाळेच्या प्रवेश अर्जांची ५०० ते सहस्र रुपयांपर्यंत विक्री !

शाळा प्रवेशाचा लुटारू बाजार ! शिक्षण विभाग आणि सरकार याकडे लक्ष देणार का ?

महाराष्ट्रात येणारा वायूप्रकल्प राज्याबाहेर कसा गेला ? याचे उत्तर उद्योगमंत्र्यांनी द्यावे ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) आस्थापन मध्यप्रदेशमध्ये नवीन प्रकल्प उभारणार आहे. महाराष्ट्रात येणारा ५० सहस्र कोटी रुपयांचा हा प्रकल्प राज्याच्या बाहेर कसा गेला ? याचे उत्तर उद्योगमंत्र्यांनी द्यावे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरात चरणतीर्थ पूजेच्या वेळी भाविकांना थेट गाभार्‍यातून दर्शनाची प्रथा चालू करा ! – किशोर गंगणे

अनादी काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार श्री तुळजाभवानीदेवीचे चरणतीर्थ, तसेच काकड आरतीच्या वेळी भाविकांना थेट गाभार्‍यातून दर्शन घेता येत होते.

मराठी भाषा धोरणाच्या कार्यवाहीसाठी मराठी भाषा विभागासाठी निधीचे प्रावधान करण्याची मागणी !

मराठीतून उच्च शिक्षण देण्याच्या निर्णयाची कार्यवाही करण्यासाठी पाठ्यपुस्तके आणि पूरक ग्रंथ यांच्या निर्मितीसाठी मराठी ग्रंथ निर्मिती मंडळाचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी ‘भाषा सल्लागार समिती’ने राज्यशासनाकडे केली आहे.

राष्ट्रविरोधी भूमिकेप्रकरणी निलंबित विद्यार्थ्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी नाकारली !

राष्ट्रविरोधी भूमिका आणि गैरवर्तन यांप्रकरणी टाटा समाज विज्ञानसंस्थेने (टिस) २ वर्षांसाठी निलंबित केलेल्या विद्यार्थ्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी नाकारली आहे.

निधीअभावी पुणे येथील ‘केळकर’ संग्रहालयाचा विस्तार रखडला !

निधीअभावी संग्रहालयाचा विस्तार रखडला जाणे लज्जास्पद आहे. आतातरी प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून संग्रहालयाच्या विस्तारासाठी निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा !