नवरात्रोत्सवात प्रतिघंट्याला १ सहस्र भाविकांना दर्शन मिळावे असे नियोजन ! – शिवराज नाईकवाडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

भाविकांची वाढती संख्या पहाता ८ ऑक्टोबर या दिवशी प्रायोगिक तत्त्वावर ९०० भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले.

गिर्ये आणि आचरा येथे सापडलेल्या चिनी बनावटीची संपर्क यंत्रणा असलेल्या नौकांची अनुज्ञप्ती ३ मासांसाठी रहित

या दोन्ही नौकांची अनुज्ञप्ती ३ मासांसाठी रहित करण्यासह दोन्ही मासेमारी नौकांना मिळून ३३ सहस्र ६०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तसेच या नौकांवर पुढील कायदेशीर कारवाईही करण्यात येणार आहे.

आपल्या परिसरातील जनतेच्या समस्या सोडवा ! – बाजीराव कळंत्रे, संपर्कप्रमुख, शिवसेना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘गाव तेथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक’, अभियान गावात राबवा. मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करून आपल्या परिसरातील जनतेच्या समस्या सोडवा, अशा सूचना कोल्हापूर दक्षिण विधानसभा संपर्कप्रमुख बाजीराव कळंत्रे यांनी केल्या.

मडगाव नगरपालिका मंडळाच्या ‘आठवडाअखेर करवसुली’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद ! – मुख्याधिकारी फर्नांडिस

‘कर वेळच्या वेळी भरला जाईल’, अशी यंत्रणा उभी केल्यास ‘आठवडाअखेर करवसुली’ मोहिमेसारख्या मोहिमा पालिकेला राबवाव्या लागणार नाहीत !

आसाममध्ये भाजपला ‘मियां मुसलमानां’ची मते नको आहेत ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा, आसाम

असे अन्य भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वाटते का ? जर वाटत असेल, तर त्यांनीही तसे वक्तव्य केले पाहिजे, असे हिंदु धर्मप्रेमींना वाटते. मुख्यमंत्र्यांनी त्याही पुढे जाऊन हिंदुहिताचे निर्णय घेण्यासाठी कृतीशील झाले पाहिजे !

पाकमध्ये हिंदु तरुणाची हत्या

पाकमधील असुरक्षित हिंदूंचे रक्षण होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणे आवश्यक !

बांगलादेशात नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर अज्ञातांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड !

बांगलादेशात अशा घटना धर्मांधच करणार, हे स्पष्ट आहे. प्रतिवर्षी नवरात्रोत्सवात अशा घटना घडण्यासह एरव्ही वर्षभर कुठे ना कुठे अशा घटना घडत असतात, यातून इस्लामी देशात हिंदूंची स्थिती कशी आहे, हे स्पष्ट होते !

आतंकवाद्यांच्या भीतीमुळे काश्मीरमधील हिंदू पुन्हा पलायन करण्याच्या सिद्धतेत !

भारतातील आतंकवादाची समस्या केवळ हिंदु राष्ट्रातील धर्माचरणी शासनकर्तेच कायमची सोडवू शकतात, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा !

मैसुरू येथील वर्ष २०१६ मधील बाँबस्फोटाच्या प्रकरणी अल् कायदाचे तिघे आतंकवादी दोषी

आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारी यंत्रणांनी प्रयत्न केले, तरच आतंकवाद समूळ नष्ट होईल !

बेंगळुरू येथील १६ मशिदींवरील ध्वनीक्षेपकांमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका

न्यायालयामध्ये यासाठी याचिका का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांना ध्वनीप्रदूषण होत असल्याचे लक्षात का येत नाही ? कि ते बहिरे आहेत ?