बांगलादेशात नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर अज्ञातांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड !

  • बांगलादेशात अशा घटना धर्मांधच करणार, हे स्पष्ट आहे. प्रतिवर्षी नवरात्रोत्सवात अशा घटना घडण्यासह एरव्ही वर्षभर कुठे ना कुठे अशा घटना घडत असतात, यातून इस्लामी देशात हिंदूंची स्थिती कशी आहे, हे स्पष्ट होते ! – संपादक
  • भारतातील प्रसारमाध्यमे अशा बातम्या कधीही प्रसिद्ध करत नाहीत; मात्र  भारतात चुकून अल्पसंख्यांकाच्या श्रद्धास्थळांविषयी काही अयोग्य घडले, तर त्याचे मोठे वृत्त प्रसिद्ध करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक
बांगलादेशात नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर अज्ञातांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड

कुश्तिया (बांगलादेश) – कुश्तिया शहरात श्री दुर्गादेवीच्या पूजेसाठी बनवण्यात आलेल्या मूर्तींची तोडफोड केल्याचे वृत्त बांगलादेशातील ‘ढाका ट्रिब्यून’ या दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. जिल्हा पूजा उत्सव समितीचे अध्यक्ष अधिवक्ता अनुप कुमार नंदी म्हणाले की, बुधवारी सकाळी आम्हाला मूर्ती तुटलेल्या स्थितीत आढळल्यानंतर आम्ही लगेच पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. ‘आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत’, अशी माहिती कुश्तिया मॉडेल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सब्बीरुल इस्लाम यांनी दिली.

१. आयका जुबसंघाच्या अरूपा परिसरातील तात्पुरत्या मंडपात ही घटना घडली. २० सप्टेंबरच्या रात्री कारागीरांनी मूर्तींना मातीचा लेप लावल्यानंतर या वाळण्यासाठी बाहेर ठेवल्या होत्या.

२. बांगलादेशात मंदिरे आणि देवता यांच्या मूर्तींची तोडफोड होण्याच्या घटना आता नेहमीच्याच झाल्या आहेत. नवरात्रोत्सवातही श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड होण्याच्या घटना घडत असतात.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक