मैसुरू येथील वर्ष २०१६ मधील बाँबस्फोटाच्या प्रकरणी अल् कायदाचे तिघे आतंकवादी दोषी

  • आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारी यंत्रणांनी प्रयत्न केले, तरच आतंकवाद समूळ नष्ट होईल ! – संपादक
  • एका बाँबस्फोटाचा निकाल ५ वर्षांनी लागणे जनतेला अपेक्षित नाही ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील मैैसुरूमधील चामराजपूरम्च्या न्यायालय परिसरातील शौचालयात १ ऑगस्ट २०१६ या दिवशी झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी न्यायालयाने ‘अल् कायदा’ या जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंधित ३ आतंकवाद्यांना दोषी ठरवले आहे. नैनार अब्बास अली उपाख्य लायब्रेरी अब्बास, एम्. सॅमसन करीम राजा उपाख्य अब्दुल करीम आणि दाऊद सुलेमान अशी त्यांची नावे असून ते सर्व जण तमिळनाडूतील मदुराई येथे रहाणारे आहेत. या सर्वांना ११ ऑक्टोबर या दिवशी शिक्षा सुनावली जाणार आहे.