कर्नाटकातील किष्किंधामध्ये हनुमानाची २१५ मीटर उंच मूर्ती स्थापन करण्यात येणार

कर्नाटकच्या जगप्रसिद्ध हम्पी येथील ‘हनुमद जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे प्रमुख स्वामी गोविंद आनंद सरस्वती यांनी कर्नाटकच्याच पम्पापूर किष्किंधा येथे भगवान हनुमानाची २१५ मीटर उंच मूर्ती लावण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

धार्मिक टोपी घातल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलंबित

आसाम पोलिसांच्या बिनतारी संदेश वहन विभागातील उपनिरीक्षक महंमद शौकत अली याला कामावर असतांना धार्मिक गोल टोपी घातल्याच्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

यंदा दिवाळीत चिनी आस्थापनांना ४० सहस्र कोटी रुपयांचा तोटा

चिनी आस्थापनांना ४० सहस्र कोटी रुपयांचा तोटा – भारतियांनी ठरवले, तर चीनला धडा शिकवता येऊ शकतो. आता भारतियांनी यात सातत्य राखत चीनची एकही वस्तू विकत घेणार नाही आणि विकणारही नाही, असे ठरवले पाहिजे !

कानपूर येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंदु तरुणाची हत्या

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदू, हिंदुत्वनिष्ठ, साधू आणि संत यांच्या सर्वाधिक हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. सरकारने येथे धर्मांधांवर वचक निर्माण करावा, असे हिंदूंना वाटते !

दिवाळीला पहाटे फटाके फोडण्याला काँग्रेसचे माजी खासदार शाहिद सिद्दीकी यांचा आक्षेप !

‘वर्षातील २-३ दिवस फटाके फोडल्यावर त्याचा त्रास होतो’, असे म्हणणार्‍यांना  स्वत:च्या अजानचा दिवसातून ५ वेळा असा वर्षांतील प्रत्येक दिवस त्रास सहन करणार्‍यांविषयी सहानुभूती का वाटत नाही ?

‘सुर-ताल हुनर का कमाल’ ही जागतिक ‘ऑनलाईन’ संगीत-नृत्य स्पर्धा

‘उर्वशी डान्स म्युझिक आर्ट अँड कल्चरल सोसायटी’च्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ संगीत-नृत्य स्पर्धेत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा परीक्षक म्हणून सहभाग !

हुतात्मा सैनिक ऋषिकेश जोंधळे अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बहिरेवाडी येथील सैनिक ऋषिकेश जोंधळे (वय २० वर्षे) हे ४ दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर येथे हुतात्मा झाले. यानंतर १६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ६.४० वाजता ऋषिकेश यांचे पार्थिव गावात आणण्यात आले.

काँग्रेससाठी आता पराभव सर्वसामान्य घटना ! – काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांची पक्ष नेतृत्वावर टीका

काँग्रेस आता भंगारात काढण्यासारखा पक्ष झाला आहे, हे त्यांच्या नेत्यांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे मोहनदास गांधी यांनी ७ दशकांपूर्वी सांगितलेली काँग्रेस विसर्जित करण्याचे मत काँग्रेसने आता स्वीकारून तिला विसर्जित करावे !

भारतात पारंपरिक भारतीय औषधांचे जागतिक केंद्र उभारणार ! – जागतिक आरोग्य संघटना

भारतीय पारंपरिक औषधांचे एक जागतिक केंद्र प्रारंभ करण्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी केली. भारतातच हे केंद्र स्थापन केले जाणार आहे.

(म्हणे) ‘संपूर्ण देशात एम्.आय.एम्.’ झेंडा फडकवत असल्याचे जग पाहील !’ – अकबरुद्दीन ओवैसी

जग पाहील की एम्.आय.एम्. संपूर्ण भारतात त्याचा झेंडा फडकवत आहे.