(म्हणे) ‘संपूर्ण देशात एम्.आय.एम्.’ झेंडा फडकवत असल्याचे जग पाहील !’ – अकबरुद्दीन ओवैसी

बिहारमधील निवडणुकीतील यशामुळे म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या ओवैसी बंधूंनी असली दिवास्वप्ने पहाणे बंद करावे आणि वर्तमानात राहून स्वतःची क्षमता लक्षात ठेवावी !

अकबरुद्दीन ओवैसी

भाग्यनगर (तेलंगाणा) – बिहारमधील निवडणुकीत एम्.आय.एम्.ला मिळालेले यश भारताच्या राजकारणात एक नवा दिनांक लिहील. जग पाहील की एम्.आय.एम्. संपूर्ण भारतात त्याचा झेंडा फडकवत आहे, असे विधान एम्.आय.एम्.चे आमदार आणि पक्षाचे प्रमुख अन् खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत एम्.आय.एम्.ने २० जागांवर निवडणूक लढवली आणि ५ जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले. या यशावर त्यांनी वरील विधान केले आहे. ‘आता बंगालमध्येही निवडणुका लढवण्यावर विचार केला जाईल’, असे विधान खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी यापूर्वी केले होते.