महर्षि व्यासनगरी यावल (जिल्हा जळगाव) येथील १४ मंदिरांत लागू होणार वस्त्रसंहिता !

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने महर्षि व्यासनगरी यावल येथे तालुकास्तरीय मंदिर विश्वस्त बैठकीचे आयोजन येथील महर्षि व्यास मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते.

श्रावण मासानिमित्त श्री सिद्धरामेश्‍वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांना आरंभ !

सोलापूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणमासानिमित्त श्री सिद्धेश्‍वर देवस्‍थान पंचकमिटी आणि श्रावणमास उत्‍सव समिती यांच्‍या वतीने विविध धार्मिक अन् सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे.

अखंड भारत संकल्‍प दिवस म्‍हणजे वैभवशाली भारतनिर्मितीचा संकल्‍प ! – आकाश जाधव, बजरंग दल

अखंड भारत संकल्‍प दिवस म्‍हणजे खंडप्राय देश एकत्र करून पुन्‍हा वैभवशाली भारत निर्माण करण्‍याचा संकल्‍प होय, असे प्रतिपादन बजरंग दलाचे जिल्‍हा संयोजक श्री. आकाश जाधव यांनी केले.

धावडशी (जिल्‍हा सातारा) येथे श्री ब्रह्मेंद्र स्‍वामी पुण्‍यतिथी महोत्‍सवाला प्रारंभ !

श्रीक्षेत्र धावडशी येथील ‘श्री देव भार्गवराम देवस्‍थान ट्रस्‍ट’च्‍या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे श्री ब्रह्मेंद्रस्‍वामी यांचा पुण्‍यतिथी महोत्‍सव १७ ते २६ ऑगस्‍ट या कालावधीत होत आहे.

आरे वसाहतीच्‍या तलावातच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होणार ! – अतुल भातखळकर, आमदार, भाजप

कित्‍येक वर्षांपासून येथे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. ‘वनशक्‍ती’ संघटना ही नेहमीच हिंदु समाज आणि विकास यांच्‍या प्रश्‍नांच्‍या विरोधात भूमिका घेते’, असा आरोपही आमदार भातखळकरांनी केला आहे.

वाडा (जिल्‍हा पालघर) येथे नाल्‍यात लाखो मृत माशांचा खच !

आस्‍थापनांमधून सोडण्‍यात येणार्‍या रसायनमिश्रीत पाण्‍यावर नियंत्रण आणण्‍यासाठी प्रशासन कधी जागे होणार ?

नेवासा शहरातून प्रवरा नदीत जाणार्‍या दूषित, रक्‍तमिश्रीत पाण्‍याविषयी ठोस कारवाई करावी ! – नागरिकांची मागणी

नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला दिसत नाही का ?

जळगाव येथे ५ लाख रुपयांची लाच मागणार्‍या विशेष लेखापरीक्षकांना अटक ! 

५ लाख रुपयांची लाच मागणारे विशेष लेखापरीक्षक सखाराम कडू ठाकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. ठाकरे यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

मुंबईत कुत्र्यावर अ‍ॅसिड फेकणार्‍या मुसलमान महिलेवर गुन्‍हा नोंद !

मुसलमान महिलाही विकृतपणाचे टोक गाठतात, हे दर्शवणारी घटना !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने काढण्‍यात आलेल्‍या ‘हिंदवी स्‍वराज्‍य स्‍वातंत्र्यदिन पदयात्रा’ने जागवले हिंदूतेज !  

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने १५ ऑगस्‍टला ‘हिंदवी स्‍वराज्‍य स्‍वातंत्र्यदिन पदयात्रा’ काढण्‍यात आली. या यात्रेत पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची वंदनीय उपस्‍थिती होती, तर सहस्रो धारकरी, हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या मूर्ती आणि भगव्‍या ध्‍वज यांना हार अर्पण करून प्रेरणा मंत्राने ही पदयात्रा प्रारंभ झाली.