भ्रष्टाचारग्रस्त महाराष्ट्र !
जळगाव – ५ लाख रुपयांची लाच मागणारे विशेष लेखापरीक्षक सखाराम कडू ठाकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी सहकारी नागरी ही पतसंस्था अवसायानात निघाल्याने तिच्या गाळ्याची अनामत रक्कम नगरपरिषदेच्या दप्तरी तक्रारदाराच्या नावे पत्र व्यवहार करून वर्ग करून देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.