उद्याने बंद ठेवून नाशिक शहरात डोळ्‍यांच्‍या साथीला प्रतिबंध !

शहरात डोळ्‍यांची साथ पसरून सहस्रो रुग्‍णांना त्‍याची लागण झाली आहे. मुलांमध्‍ये ही साथ पसरू नये; म्‍हणून नाशिक महापालिकेने १८ ते ३१ ऑगस्‍टपर्यंत म्‍हणजे १४ दिवस ४५० उद्याने बंद ठेवण्‍याचे आदेश दिले आहेत.

जिल्‍हा परिषदेच्‍या प्राथमिक शाळेतील २ शिक्षकांमध्‍येच हाणामारी !

म्‍हसवड येथील माने वस्‍तीवरील शाळेत शशिकांत खाडे आणि विठ्ठल बागल या २ शिक्षकांमध्‍येच हाणामारी झाली. विद्यार्थ्‍यांसमोर शाळेच्‍या आवारातच हा प्रकार घडला.

स्‍थायी समितीच्‍या माध्‍यमातून वर्षभरात ६०० कोटी रुपयांची विकासकामे करण्‍याचा प्रयत्न ! – धीरज सूर्यवंशी, सभापती, स्‍थायी समिती 

घनकचरा व्‍यवस्‍थापन, सुसज्ज नाट्यगृह, वारणा उद़्‍भव पाणी योजना यांसह विविध योजनांची कार्यवाही करत स्‍थायी समितीच्‍या माध्‍यमातून वर्षभरात ६०० कोटी रुपयांची विकासकामे करण्‍याचा प्रयत्न केला, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे स्‍थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दांपत्‍याने केलेल्‍या मारहाणीत रूळांवर पडलेल्‍याचा रेल्‍वेखाली चिरडून मृत्‍यू !

समाजात संयमच राहिला नसल्‍याचे दर्शवणारी घटना !

श्रावण मासात त्र्यंबकेश्‍वर मंदिर दर्शनासाठी पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले ! 

अधिक मास समाप्‍तीनंतर श्रावण मासाला प्रारंभ झाला आहे. जिल्‍ह्यातील त्र्यंबकेश्‍वर मंदिरात श्रावण मासात भाविकांची अलोट गर्दी असते. या पार्श्‍वभूमीवर त्र्यंबकेश्‍वर देवस्‍थान विश्‍वस्‍तांनी  दर्शनासाठी मंदिर प्रतिदिन पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत, तर एकूण ४ श्रावणी सोमवारी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले असणार, असा निर्णय घेतला आहे. 

पोलिसांच्‍या सतर्कतेमुळे २ अल्‍पवयीन युवतींच्‍या अपहरणाचा धर्मांधांनी केलेला प्रयत्न फसला !

चंदगड तालुक्‍यातील एका तालुक्‍यातील एक अल्‍पवयीन युवती सकाळी शाळेत जाते म्‍हणून गेली ती शाळेत पोचलीच नसल्‍याचे तिच्‍या पाल्‍यांच्‍या लक्षात आले. त्‍यामुळे तिच्‍या पालकांनी पोलीस ठाण्‍यात तशी तक्रार दिली.

‘इंस्‍टाग्राम’वर देवतांचे विडंबन करणारी बनावट खाती आणि चालक यांवर कारवाई करा ! – अधिवक्‍ता महेश धांडे

महापुरुष आणि देवता यांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्‍यासाठी सक्षम कायदा शासनकर्ते केव्‍हा करणार आहेत ?

स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पार्श्‍वभूमीवर पुणे येथील कोंढवा भागात ‘पाकिस्‍तान झिंदाबाद’च्‍या घोषणा !

अशा धर्मांधांना त्‍वरित कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !

मुंब्रा येथे उघड्यावर पडलेल्‍या विद्युत्‌वाहिनीच्‍या झटक्‍याने एकाचा मृत्‍यू !

निष्‍काळजीपणा करून नागरिकांच्‍या जिवाशी खेळणार्‍या वीज वितरण आस्‍थापनावर कठोर कारवाई करायला हवी !

एकतर्फी प्रेमातून येरवडा (पुणे) कारागृहातील महिला शिपायाला पेटवून देण्‍याचा प्रयत्न !

तिच्‍या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्‍याचा प्रयत्न केला. त्‍या वेळी महिला आरोपीला धक्‍का देऊन आतील खोलीत लपून बसल्‍याने अनर्थ टळला. येरवडा पोलिसांनी गुन्‍हा नोंदवून घेत आरोपी पाटील यांना अटक केली आहे.