कलम ३७० चा अंत म्हणजे जम्मू-काश्मीरमधील रक्तपाताच्या ७० वर्षांच्या प्रदीर्घ काळाचा अंत !

कलम ३७० संदर्भात राज्यसभेतील सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांविषयी गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी उत्तरादाखल केलेल्या भाषणाचा संकलित भाग वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

घोटाळे आणि लैंगिक शोषणाची केंद्रे बनत चाललेल्या चर्चचे सरकारीकरण करण्याविषयी शासनदरबारी द्यावयाचे निवेदन !

नुकतेच एका चर्चसंस्थेच्या भूमीची अवैधरित्या विक्री झाल्यामुळे सर्वांत मोठा भूमी घोटाळा उघडकीस आला आहे. भारतातील चर्च ही धर्मांतर आणि लैंगिक शोषणाची केंद्रे असल्याच्या घटना वारंवार घडत असतांना भूमी घोटाळ्याचे प्रकरण उघड होणे, यावरून चर्च ही भ्रष्टाचाराचीही केंद्रे आहेत का ?, असा प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. …

प्रदूषणकारी कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी आणण्याविषयी शासनदरबारी द्यावयाचे निवेदन !

प्रतिवर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत तथाकथित पर्यावरणप्रेमी संघटना भाविकांना ‘इको फ्रेंडली’ मूर्तींच्या नावाखाली कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्ती विकत घेण्यासाठी प्रोत्साहित करतात.कागद पाण्यात विरघळत नसल्याने अशा मूर्तींपासून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते….

युद्धाची सिद्धता, प्रत्यक्ष युद्ध आणि नागरिक !

भारताने जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देण्यात आलेले कलम ३७० रहित केले आहे आणि त्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले आहेत. यामुळे स्वाभाविक पाकिस्तान आणि चीन संतप्त झाले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांकडून केल्या जाणार्‍या कचरा व्यवस्थापनाविषयीच्या लेखा परीक्षणात उघड झाले महाराष्ट्राचे ओंगळवाणे रूप !

प्रस्तुत लेखमालिकेत वर्ष २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात महालेखापालांनी महाराष्ट्रातील स्थानिक संस्था, म्हणजेच महानगरपालिका आणि नगरपालिका यांचे नगरविकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता या विभागांशी संबंधित काही निरीक्षणे दिली होती.

जुलै २०१९ मध्ये दूरचित्रवाणीवर मुंबई आणि ठाणे येथील जोरदार पाऊस पडल्याच्या वार्ता दाखवत असतांना सरकारी यंत्रणा कशी आहे, हे अनुभवणे आणि हिंदु राष्ट्राची किती आवश्यकता आहे ?, याची जाणीव होणे

या वर्षी जुलै मासात मुंबई आणि ठाणे येथे जोरदार पाऊस पडला. दूरचित्रवाणीवर  महानगरपालिकेच्या कामाचे स्वरूप नेहमीप्रमाणे दाखवले जात होते. तसेच पावसाच्या वार्ताही सतत दाखवल्या जात होत्या.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची प्रक्रिया काश्मीरपासून चालू झाली ! – राहुल कौल, पनून कश्मीर

जम्मू-काश्मीरच्या संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांच्या संदर्भात प्रतिक्रिया

काश्मीरच्या विकासाला गती मिळेल ! – ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन, पुणे

केंद्र सरकारने एक अतिशय चांगले पाऊल उचलले आहे. कलम ३७० आणि ३५ (अ) यांमुळे काश्मीरची आर्थिक प्रगती पूर्णपणे थांबली होती. गेली ७१ वर्षे काश्मीरच्या विकासासाठी प्रचंड पैसा येत होता; पण तो तेथील २०० ते ३०० मुख्य कुटुंबांच्या खिशांत जायचा.

भारतातील अनेक समस्यांना कारणीभूत असलेला लोकसंख्येचा विस्फोट आणि सर्व स्तरांवरील उदासीनता !

जून २०१९ मध्ये ‘भारत वर्ष २०३० पर्यंत लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकणार’, अशा बातम्या झळकल्या. लोकसंख्येच्या संदर्भात सर्वपक्षीय नेते गंभीर दिसत नाहीत. प्रत्येकाला आपली व्होट बँक प्रिय आहे.

सोलापूर येथील वृत्तवाहिनीच्या निवेदिका सौ. रेणुका बुधारम यांनी सनातनच्या २ ग्रंथांचे लिहिलेले अभ्यासपूर्ण समीक्षण ‘दैनिक सुराज्य’मध्ये प्रसिद्ध !

‘सोलापूर येथील ‘स्वरांजली’ या तेलुगु वृत्तवाहिनीच्या निवेदिका सौ. रेणुका बुधारम यांनी सनातन संस्थेचे ‘आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म’ आणि ‘सात्त्विक रांगोळ्या’ या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचन केले. त्यांना हे ग्रंथ पुष्कळ आवडले


Multi Language |Offline reading | PDF