भाव-भावनांतील दुजाभाव !

उत्तरांचल ही देवभूमी आहे. अलीकडे तेथे महापूर, भूस्‍खलन अशा अनेक आपत्ती येण्‍याचे प्रमाण वाढत आहे. यातून निसर्गाला कुठला वेगळा संदेश द्यायचा आहे का ? सातत्‍याने वेगवेगळ्‍या प्रकारच्‍या येणार्‍या अडथळ्‍यांवरून ‘निसर्गाला खरोखरच असा विकास मान्‍य आहे का ?’, याचेही चिंतन करण्‍याची वेळ आली आहे.

पोलीस दल कि वासनांधांचा अड्डा ?

पोलीस ज्‍या गुन्‍ह्यांसाठी गुन्‍हेगारांना पकडतात, तेच गुन्‍हे जर खाकी वेशातील पोलिसांची टोळी करू लागली, तर अराजकतेखेरीज दुसरे काय निर्माण होणार ? महिलांना पोलीस दलातील वासनांधांकडून धोका असणे, हे महाराष्‍ट्राला अत्‍यंत लज्‍जास्‍पद !

‘डीपफेक’ची डोकेदुखी !

‘डीपफेक’चे हे भयावह संकट रोखण्‍यासाठी समाज संयमी आणि नीतीमान असणे आवश्‍यक आहे अन् हे गुण साधनेने किंवा उपासनेनेच येऊ शकतात. तंत्रज्ञानाचे दुष्‍परिणाम टाळण्‍यासाठी समाजाने धर्माचरण करून नीतीवान आणि संयमी होणे अपेक्षित !

मंदिरांचे सरकारीकरण नकोच !

मंदिरांचे सरकारीकरण करून मोठा धर्मद्रोह सरकारी विश्‍वस्‍तांकडून होत आहे. यास्‍तव सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या या निकालाचा लाभ देशभरातील सरकारीकरण झालेल्‍या हिंदु मंदिरांनी उठवून ती भक्‍तांच्‍या हाती पुन्‍हा येण्‍यासाठी कंबर कसण्‍याची धर्मसेवा करायला हवी हे निश्‍चित !

सरकारी भूमी अतिक्रमणमुक्‍त केव्‍हा ?

‘एका समुदायाचे मंडळ सरकारी भूमीवर दावा सांगते आणि प्रशासन त्‍यावर काहीच कारवाई करत नाही’, ही निष्‍क्रीयता कुंभकर्णी झोपेतील भ्रष्‍ट सरकारी अधिकारी आणि पोलीस यांच्‍यामुळेच आहे. सरकारी भूमी अतिक्रमणकर्त्‍यांच्‍या घशात जाऊ देणारे अधिकारी आणि पोलीस यांच्‍यावर जरब बसेल, अशी कारवाई होणे आवश्‍यक !

हिरव्यावर मर्जी, भगव्याची ॲलर्जी !

‘भगवद्गीतेचे शिक्षण देणे, म्हणजे शिक्षणाचे भगवेकरण आणि अल्पसंख्यांकांच्या शाळांमध्ये कुराण अन् बायबल शिकवणे, म्हणजे निधर्मीपणा असेल’, तर अशी धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या काय कामाची ? भारतीय संस्कृतीचा प्रचार हे भगवेकरण असेल, तर भारताला याच भगवेकरणाची आवश्यकता आहे !

निरागसतेमागील राष्‍ट्रघातकी चेहरा !

आतंकवादाचे समर्थन करण्‍याच्‍या माध्‍यमातून हे पर्यावरणवादी जगातील वातावरण दूषित करू पहात आहेत. अशांचे कुणाकुणाशी संबंध आहेत ? तसेच त्‍यांची मानसिकता कशी आहे ? ते जाणून घेतल्‍यासच पर्यावरणप्रेमाच्‍या निरागसतेमागील राष्‍ट्रघातकी चेहरे समोर येऊन त्‍यांचे बिंग फुटेल, हे निश्‍चित !

क्रिकेट जिहाद ?

पाकचे क्रिकेटपटूही विविध प्रसंगांमधून भारताची मानहानी करण्‍याची एकही संधी सोडत नाहीत. त्‍यामुळे यापुढील काळात पाकिस्‍तानच्‍या ‘क्रिकेट जिहाद’ला पाकिस्‍तानशी क्रिकेट खेळण्‍यावर कायमस्‍वरूपी बहिष्‍कार घालणे, हेच योग्‍य उत्तर ठरेल !

हिंदु नेते असुरक्षित !

हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, राष्‍ट्रपुरुष आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांच्‍याकडे वक्रदृष्‍टीने पहाण्‍याचे धाडस कुणी करणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण करावी !