सरकारी भूमी अतिक्रमणमुक्‍त केव्‍हा ?

‘एका समुदायाचे मंडळ सरकारी भूमीवर दावा सांगते आणि प्रशासन त्‍यावर काहीच कारवाई करत नाही’, ही निष्‍क्रीयता कुंभकर्णी झोपेतील भ्रष्‍ट सरकारी अधिकारी आणि पोलीस यांच्‍यामुळेच आहे. सरकारी भूमी अतिक्रमणकर्त्‍यांच्‍या घशात जाऊ देणारे अधिकारी आणि पोलीस यांच्‍यावर जरब बसेल, अशी कारवाई होणे आवश्‍यक !

हिरव्यावर मर्जी, भगव्याची ॲलर्जी !

‘भगवद्गीतेचे शिक्षण देणे, म्हणजे शिक्षणाचे भगवेकरण आणि अल्पसंख्यांकांच्या शाळांमध्ये कुराण अन् बायबल शिकवणे, म्हणजे निधर्मीपणा असेल’, तर अशी धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या काय कामाची ? भारतीय संस्कृतीचा प्रचार हे भगवेकरण असेल, तर भारताला याच भगवेकरणाची आवश्यकता आहे !

निरागसतेमागील राष्‍ट्रघातकी चेहरा !

आतंकवादाचे समर्थन करण्‍याच्‍या माध्‍यमातून हे पर्यावरणवादी जगातील वातावरण दूषित करू पहात आहेत. अशांचे कुणाकुणाशी संबंध आहेत ? तसेच त्‍यांची मानसिकता कशी आहे ? ते जाणून घेतल्‍यासच पर्यावरणप्रेमाच्‍या निरागसतेमागील राष्‍ट्रघातकी चेहरे समोर येऊन त्‍यांचे बिंग फुटेल, हे निश्‍चित !

क्रिकेट जिहाद ?

पाकचे क्रिकेटपटूही विविध प्रसंगांमधून भारताची मानहानी करण्‍याची एकही संधी सोडत नाहीत. त्‍यामुळे यापुढील काळात पाकिस्‍तानच्‍या ‘क्रिकेट जिहाद’ला पाकिस्‍तानशी क्रिकेट खेळण्‍यावर कायमस्‍वरूपी बहिष्‍कार घालणे, हेच योग्‍य उत्तर ठरेल !

हिंदु नेते असुरक्षित !

हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, राष्‍ट्रपुरुष आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांच्‍याकडे वक्रदृष्‍टीने पहाण्‍याचे धाडस कुणी करणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण करावी !

चालत्‍या शवपेट्या !

‘प्रत्‍येक वाहनाला सुरक्षेचे मानक असतात. असे मानक ‘स्‍लिपर कोच’ बसगाड्यांना आहेत कि नाहीत ?’, असा प्रश्‍न निर्माण होतो. एवढे अपघात होऊनही संबंधित सरकारांनी ते रोखण्‍यासाठी काहीही उपाय योजले नाहीत, हेच या अपघातांची वाढती संख्‍या दर्शवते.

पाकमधील ‘घुसखोर !’

पाकमध्‍ये घुसखोरांमुळे झालेल्‍या स्‍थितीचा लाभ उठवून भारताने त्‍याला कोंडीत पकडणे आवश्‍यक !

महुआ मोईत्रांवरील कारवाई योग्‍यच !

लोकशाहीचे मंदिर असलेल्‍या लोकसभेमध्‍ये भ्रष्‍टाचार होणे, हे व्‍यवस्‍था आणि सर्वपक्षीय शासनकर्ते यांना लज्‍जास्‍पद !

तिरस्‍कारी काँग्रेस !

वर्ष २०१४ मध्‍ये देशातील जनतेने काँग्रेसला केंद्रीय सत्तेतून हटवले. याला ९ वर्षे उलटून गेली आहेत; मात्र यातून काँग्रेसने धडा घेतलेला दिसत नाही. गेल्‍या ९ वर्षांत ‘भारत काँग्रेसमुक्‍त’ करण्‍याच्‍या घोषणा दिल्‍या जात असतांना अजूनही काँग्रेसमध्‍ये जीव आहे.