सोनिया गांधी निवडून गेल्यावर जनतेला भेटत नाहीत ! – काँग्रेसच्याच आमदार अदिती सिंह यांची टीका

काँग्रेसच्या गांधी घराण्याने जितकी वर्षे देशावर राज्य केले तितकी वर्षे जनतेसाठी आणि देशासाठी काहीही केले नाही

नागपूर येथे दादागिरी करणार्‍या गुंडाची जमावाने केली दगडाने ठेचून हत्या !

शहरातील नारायण पेठ परिसरात गुंड विजय वागधरे याच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त लोकांनी त्याची ७ फेब्रुवारीच्या रात्री दगडाने ठेचून हत्या केली.

मुंबई येथे २ अमली पदार्थ तस्करांना एन्.सी.बी.कडून अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एन्.सी.बी) येथील जोगेश्‍वरी परिसरातून इब्राहिम मुजावर उपाख्य इब्राहिम कासकर आणि आसिफ राजकोटवाला या २ अमली पदार्थ तस्करांना ७ फेब्रुवारी या दिवशी अटक केली आहे. एन्.सी.बी.ने या आरोपींकडून चारचाकीही हस्तगत केली आहे.

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारच्या प्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याला अटक

एका संवेदनशील प्रकरणातील आरोपीला १४ दिवसांनी अटक करणार्‍या पोलिसांची (अ)कार्यक्षमता !

मनपाचे कर्मचारी असल्याचे सांगून ब्रिटीशकालीन वडाचे झाड कापले

महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगून भरदिवसा अपप्रकार करण्याचे धारिष्ट्य करणार्‍यांवर कठोर कारवाई केली, तरच इतरांना जरब बसेल !

यवतमाळ येथे फसवेगिरी करणार्‍यांविरुद्ध तक्रार देण्याचे ग्रामोद्योग मंडळाचे आवाहन !

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, तसेच खादी आयोग या ३ कार्यालयांच्या वतीने पी.एम्.ई.जी. आणि सी.एम्. ई.जी.पी. या योजना ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या अंतर्गत विविध उद्योगांचे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांची त्या पोर्टलवर छाननी केली जाते.

तुर्भे येथील गुंडगिरीला घाबरू नका ! – गणेश नाईक

गणेश नाईक पुढे म्हणाले की, येथील गुंडांना कुणीही घाबरू नका. जर त्यांचा त्रास झाला, तर मला कळवा. रात्री अपरात्रीही मी तुमच्यासाठी धावून येईन.

प्रदूषणामुळे तेरवाड (जिल्हा कोल्हापूर) नंतर आता शिरोळ बंधार्‍यात सहस्रो मासे मृत्यूमुखी

निष्क्रीय आणि दायित्वशून्य प्रदूषण मंडळ !

डायघर (जिल्हा ठाणे) येथील मंदिरात चोरी करणारे धर्मांध अटकेत

डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिळ फाट्याजवळील पिंपरी गावात असलेल्या केदारेश्‍वर मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेटीची चोरी झाली. या प्रकरणी चोर शरीफ शेख आणि मोहंमद मुल्ला या दोघांना डायघर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.

११ वर्षांनंतर माणिकपूर (पालघर) येथील २ लाचखोर पोलिसांना शिक्षा

माणिकपूर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस नाईक संजय देशमुख आणि बाबासाहेब बोरकर यांनी गाडीच्या अपघाताची नोंद घेऊन गाडीची कागदपत्रे अन् पंचनाम्याची प्रत देण्यासाठी ४ सहस्र रुपयांची लाच घेतली होती.