दोडामार्ग तालुक्यातून गोव्यात कामानिमित्त ये-जा करणार्‍यांना आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी बंधनकारक

कामानिमित्त गोव्यात ये-जा करायची असल्यास आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.

देहलीमध्ये २६ एप्रिलपर्यंत दळणवळण बंदी घोषित

देहली राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दळणवळण बंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपराज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात पार पडलेल्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रात कडक दळणवळण बंदी लागू करण्याविषयी २ दिवसांत निर्णय अपेक्षित ! – विजय वडेट्टीवार, साहाय्य आणि पुनर्वसन मंत्री

अनेक व्यापार्‍यांचा दळणवळण बंदीला विरोध होता; मात्र आता व्यापारी, जीवनावश्यक वस्तूंचे वितरक आणि अन्य लहान दुकानदार १०० टक्के दळणवळण बंदीची मागणी करत आहेत.

देहलीमध्ये मास्कविषयी विचारणा केल्याने दांपत्याकडून पोलिसांना शिवीगाळ

मास्क न लावता चारचाकी गाडीतून प्रवास करणार्‍या दांपत्याला पोलिसांनी रोखल्यावर या दांपत्याने पोलिसांना शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

कर्करोग बरा करण्याच्या नावाखाली हिंदु कुटुंबाकडून ८० सहस्र रुपये उकळणार्‍या पाद्य्राच्या विरोधात गुन्हा नोंद

अशा बातम्या तथाकथित ढोंगी निधर्मीवादी प्रसारमाध्यमे दडपतात आणि अंनिसवाले भोंदू ख्रिस्ती पाद्य्रांविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

हासन (कर्नाटक) येथे रेव्ह पार्टीवर घातलेल्या धाडीत महिला पोलीस शिपायाला अटक !

ज्यांनी कायद्याचे रक्षण करावे, तेच कायद्याचे उल्लंघन करत असतील, तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील? अशांना बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

कायद्याचे शिक्षण घेतांनाच अधिवक्त्यांमध्ये भेदभाव करण्यात येतो ! – न्या. चंद्रचूड यांचे निरीक्षण

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड ‘शिक्षण आणि नोकरी येथे समाजातील घटकांवर होणार्‍या भेदभावाचे निर्मूलन’ या विषयावर आयोजित एका ऑनलाईन परिषदेत बोलत होते.

कुंभमेळा आणि मरकज यांची तुलना होऊ शकत नाही ! – आचार्य महामंडलेश्‍वर श्री रामकृष्णानंद महाराज

कुंभमेळा आणि मरकज यांची तुलना होऊ शकत नाही. हिंदूंच्या कुंभमेळ्याला धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) प्रसारमाध्यमे आणि साम्यवादी विरोध करत आहेत, हे चुकीचे आहे, असे प्रतिपादन श्री पंच अग्नि आखाड्याचे महामंत्री आचार्य महामंडलेश्‍वर श्री रामकृष्णानंद महाराज यांनी केले.

पहुर (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधाचा बालिकेवर लैंगिक अत्याचार !

कोरोनाने देशात थैमान घातले असतांना आपत्काळातही वासनांध धर्मांधांची वृत्ती पालटत नाही, हे लक्षात घ्या !

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथे कोरोना रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू !

ब्रह्मपुरी शहरातील ख्रिस्तानंद रुग्णालयात असलेल्या प्रवासी निवार्‍यात उपचाराविनाच एका कोरोनाबाधिताचा तडफडून मृत्यू झाला. मृतक नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील आंबोरा येथील असून तेथील आधुनिक वैद्यांनी त्याला ब्रह्मपुरी येथे पाठवले होते.