पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका !

वर्ष २०२० मध्ये महाराष्ट्रात गुप्तचर विभागाच्या आयुक्तपदी असतांना रश्मी शुक्ला यांनी पोलिसांच्या स्थानांतरासाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचा अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालकांना पाठवला होता. यामध्ये त्यांनी काही पोलीस अधिकारी आणि राजकीय नेते यांच्या संभाषणाचे ….

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या नियोजनबद्धतेमुळे कोरोनाबाधितांची संख्या घटली !

नंदुरबारने एप्रिलच्या प्रारंभी दिवसाला १ सहस्र २०० पर्यंत गेलेली नव्या रुग्णांची संख्या विविध प्रयोगांमुळे आता प्रतिदिन २५० आणि ३०० पर्यंत खाली आणली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या नियोजनबद्ध कामाचा हा परिणाम आहे. ऑक्सिजनच्या पूर्ततेविषयी नंदुरबार जिल्हा ५० टक्के स्वयंपूर्ण झाला आहे.

अमरावती जिल्ह्यातील १०६ गावांमध्ये बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी !

जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील १०६ गावे कोरोनाने सर्वाधिक प्रभावित गावांच्या सूचीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे या गावांमध्ये बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. महसूल विभागाने हा आदेश काढला आहे.

अवैध धंद्यांवर कारवाईसाठी स्थापन केलेल्या विशेष पथकातील पोलिसांनीच वाळू व्यावसायिकाकडे मागितली लाच !

पथकातील पोलीस लाच मागत आहेत, हे ठाऊक असूनही त्यांच्यावर त्याच वेळी कडक कारवाई न झाल्याने ते पळून जाऊ शकले. अशा दायित्वशून्य पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी !

पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडून परमबीर सिंह यांचे अन्वेषण करण्यास नकार !

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहविभागाला पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे अन्वेषण करण्यास नकार कळवला आहे. पांडे यांनी नकार का दिला ? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही; मात्र यातून केंद्र आणि राज्य शासन यांच्यातील अंतर्गत कुरघोड्या ….

बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर प्रशांत किशोर यांचा राजकारणातून संन्यास

बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या विजयात महत्त्वाचा वाटा असणारे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ‘राजकीय रणनीतीकार’ म्हणून निवृत्ती घेत राजकारणाला रामराम ठोकला आहे.

नागपूर येथे मनरेगाचे आयुक्तालय आगीत बेचिराख

सिव्हिल लाईन्स परिसरात प्रशासकीय इमारत क्रमांक २ मध्ये पहिल्या माळ्यावर असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या राज्य आयुक्तालयात २ मे या दिवशी सकाळी मोठी आग लागली.

लसीच्या तुटवड्यामुळे मुंबईमध्ये ४५ वर्षे वयापुढील नागरिकांचे कोरोनावरील लसीकरण बंद !

लसीच्या मर्यादित साठ्यामुळे मुंबईमध्ये ४५ वर्षे वयापुढील नागरिकांचे कोरोनावरील लसीकरण बंद करण्यात आले आहे. लसीचा साठा प्राप्त होताच नागरिकांना कळवण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

फलटण (जिल्हा सातारा) येथील कसाईनगर येथील २ पशूवधगृहांवर धाड !

गोवंशियांना हत्येसाठी आणल्याची माहिती गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनाच अगोदर कशी मिळते ? पोलिसांना का मिळत नाही, याचा विचार पोलीस करतील का ?

करीमगंज (आसाम) येथील मंदिरात दरोडा टाकणार्‍या १२ धर्मांधांच्या टोळीला अटक !

धर्मांधांची लुटारू टोळी धनाढ्य इस्लामी संघटनांची कार्यालये किंवा मशिदी यांठिकाणी दरोडा टाकत नाहीत, तर मंदिरांवर दरोडा घालतात. यातून त्यांची धर्मांधता दिसून येते !