कामगारांना आर्थिक साहाय्याची शासनाकडून केवळ घोषणा, कामगार आयुक्त कार्यालयास सूचनाच नाही !

कामगारांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागवण्यासाठी येणार्‍या अडचणींवर तोडगा म्हणून सक्रीय बांधकाम कामगारांना दळणवळण बंदी मध्ये २-३ सहस्र रुपये आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली, परंतु कामगारांना ही रक्कम अजून मिळालेली नाही.

चिमणगाव (जिल्हा सातारा) येथील रेशन दुकानामध्ये अवैधरित्या मद्यविक्री

कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे एका रेशन दुकानातच अवैधरित्या मद्यविक्री चालू होती. या ठिकाणी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून संबंधिताना कह्यात घेतले असून ७ लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे.

गृहविलगीकरणातील कोरोनाबाधित रुग्णांवर आता शिक्षकांची दृष्टी रहाणार !

कोरोनाची सौम्य लक्षणे झाल्यानंतर ग्रामीण भागातील रुग्ण गृहविलगीकरणात रहाण्याची विनंती करतात. त्यांना तशी अनुमती दिली जाते; मात्र नंतर रुग्ण बाहेर फिरतात आणि संसर्ग वाढतो. त्यामुळे अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्याचे दायित्व प्राथमिक शिक्षकांवर सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यातील आरोग्यव्यवस्था नेमकी कुणासाठी ? – आम आदमी पक्षाचा प्रश्‍न

हेल्पलाईनवरून खाटा मिळवून देण्यासाठी साहाय्य केले जात असले, तरी त्याच वेळी सर्व खासगी रुग्णालये आणि सरकारी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची थेट भरती होते. गंभीर रुग्णाला अत्यावश्यक व्हेंटिलेटर सज्ज खाटा थेट रुग्णालयांकडून भरल्या जातात. त्यामुळे या जागा हेल्पलाईन वर उपलब्ध होत नाहीत असे दिसले.

रेमडेसिविर इंजेक्शनचा नियमित पुरवठा आणि सामायिक वितरणाविषयी राज्य आणि केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश

न्यायालयाला केंद्र आणि राज्य सरकार यांना निर्देश देऊन कामे करवून घ्यावी लागतात, हे लज्जास्पद आहे. सर्व यंत्रणा हाताशी असतांना न्यायालयाला निर्देश द्यावे लागतात, याचा सरकारने विचार करावा !

ऑनलाईन ‘वीर सावरकर कालापाणी मुक्ती शताब्दी व्याख्यानमाला’ चालू

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू क्रांतीवीर गणेश दामोदर सावरकर यांची २ मे १९२१ या दिवशी अंदमानच्या सेल्युलर कारागृहातून मुक्तता झाली. या ऐतिहासिक घटनेला २ मे २०२१ या दिवशी एक शतक पूर्ण झाले.

नगर येथे विवाह सोहळ्यावर कारवाई करत वधूपित्याला १० सहस्र रुपयांचा दंड !

२ मे या दिवशी सकाळी साडेदहा वाजता लोकांची गर्दी जमवून विवाह समारंभ होत असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच पोलिसांनी पथकासह पाहणी करत मुलीच्या घरी विवाह आयोजित केल्याने वधूपित्याला १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला.

एकच गोळी घेऊन कोरोना दूर करणार्‍या गोळीची फायझर आस्थापनाकडून चाचणी

औषध निर्मिती करणार्‍या फायझर आस्थापनाने कोरोना प्रतिबंधात्मक लस बनवल्यानंतर आता कोरोना झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यासाठी गोळी बनवली असून त्याची चाचणी सध्या चालू आहे.

भंडारा येथे रेमडेसिविरचा काळाबाजार केल्याप्रकरणी ३ महिला परिचारिकांसह ६ जणांना अटक

४ इंजेक्शन, ९० सहस्र रुपये रोख, दुचाकी, ३ भ्रमणभाष आणि औषध साठा असा १ लाख ७० सहस्र ९६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

माजी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम्. श्रीनिवास रेड्डी यांना न्यायालयीन कोठडी !

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेले प्रकल्प संचालक तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम्. श्रीनिवास रेड्डी यांची १ मे या दिवशी न्यायालयीन कोठडीत पाठवणी करण्यात आली.