प्रसारमाध्यमांना वार्तांकन करण्यास थांबवू शकत नाही !

सुनावणी करत असतांना न्यायालय जी मते व्यक्त करते त्यांचे वार्तांकन करण्यापासून प्रसारमाध्यमांना रोखू शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले.

पाकचे सैन्य भारतासमोर २४ घंटेही टिकणार नाही !

पाकमधील नेत्यांना हे ठाऊक असूनही तेथील शासनकर्ते भारताच्या विरोधात गरळ ओकण्याचे आणि पाकचे सैन्य कुरापती काढण्याचे प्रयत्न करत असतात. ‘भारत आपल्यावर आक्रमण करणार नाही’, असा अपसमज त्याला झाला आहे.

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकासनिधीतून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला रुग्णवाहिका प्रदान !

भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकासनिधीतून ३ मे या दिवशी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेला रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली.

आय.पी.एल्.मधील कोलकाताच्या संघातील २ खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने सामना रहित !

कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे सांगत हरिद्वार येथील कुंभमेळा रहित करण्याची मागणी करणारे आय.पी.एल्.विषयी गप्प का आहेत ?

पुण्यातील आरोग्यव्यवस्था नेमकी कुणासाठी ? – आम आदमी पक्षाचा सवाल

रुग्ण संख्या वाढत असतांना ऑक्सिजनच्या खाटा उपलब्ध नाहीत, व्हेंटिलेटर खाटा मिळत नाहीत. त्यामुळे जनतेला उपचार मिळणे हा हक्क असेल तर ही आरोग्य व्यवस्था नक्की कुणासाठी काम करते ? असा संतप्त सवाल आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

काशिळ (जिल्हा सातारा) येथील ग्रामीण रुग्णालयात चालू होणार कोविड रुग्णालय !

कोरोनाने महाभयंकर रूप धारण केलेले असतांना काशिळ येथील ग्रामस्थांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर कोविड रुग्णालय चालू होते. तर अगोदरच त्यांची आवश्यकता ओळखून प्रशासनाने रुग्णालय का चालू केले नाही ?

जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांना पितृशोक

जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर यांचे वडील दत्तात्रय बिडकर (वय ८१ वर्षे) यांचे २ मे या दिवशी विटा येथील रुग्णालयात निधन झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीच्या घडामोडी

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी चालू केलेल्या कोरोनामुक्त रुग्णांना विनामूल्य घरी सोडण्याच्या सेवेचा २६ कुटुंबियांनी लाभ घेतला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण

महाराष्ट्र राज्यात १८ ते ४४ वर्षे या वयोगटातील सर्व नागरिकांसाठी १ मेपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ झाला आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन आणि खाटा यांचा तुटवडा : कोरोनाचा कहर चालू असूनही ‘व्हीआयपी’ संस्कृती कार्यरत

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी निवासी डॉक्टरांचे प्रश्‍न सोडवण्याचे दिले आश्‍वासन