अमेरिकेत शिवराज्याभिषेक ; शिवजयंतीनिमित्त मराठी बांधवांकडून महानाट्य

DARHCT आणि CTMM चमूने अख्खे शिवचरित्र ३५ मिनिटांत नाट्य स्वरूपात प्रस्तुत केले.

भारतच नाही, तर संपूर्ण जगात आमचा एक शेजारी देश आतंकवाद्यांना साहाय्य करत आहे ! 

भारताचा एक शेजारी देश केवळ भारतच नाही, तर जगभरातील आतंकवाद्यांना आश्रय आणि साहाय्य करत आहे. याला त्या देशाच्या सरकारचेही समर्थन आहे, अशी टीका भारताच्या प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकचे नाव न घेता केली.

आम्ही कोणत्याही पारंपरिक औषधाला मान्यता दिलेली नाही ! – जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

आयुर्वेदीय औषधोपचाराने कोरोना बरा झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे कुणाच्या प्रमाणपत्रांची वाट न पहाता केंद्र सरकारने आयुर्वेदीय औषधोपचार करणार्‍यांना अभय देणे आवश्यक !

धर्मच ती शक्ती आहे जी जगातील मोठ्या लोकसंख्येला ‘पर्यावरण योद्धा’ बनवू शकते ! – संयुक्त राष्ट्रे

उशिरा का होईना संयुक्त राष्ट्रांना धर्माचे महत्त्व लक्षात आले आहे. हिंदु धर्मात निसर्ग आणि पर्यावरण यांना पुष्कळ महत्त्व देण्यात आल्याने त्याच्या रक्षणाचा नेहमीच प्रयत्न केला जातो ! हिंदु धर्मानुसार आचरण केल्यासच खर्‍या अर्थाने पर्यावरणाचे रक्षण होईल !

माझ्या यशात भारतीय संस्कारांचा मोठा वाटा !

‘नासा’च्या मंगळ मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या स्वाती मोहन यांचे प्रतिपादन !

माझ्या यशात भारतीय संस्कारांचा सर्वांत मोठा वाटा !

माझ्या कुटुंबात भारतीय मूल्यांचा वारसा आहे. हीच सर्वांत मोठी शिकवण आहे.- ‘नासा’तील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ स्वाती मोहन

अमेरिकेच्या दक्षिण भागात आलेल्या हिमवादळामुळे वीज, पाणी आणि अन्न यांविना लाखो लोकांचे प्रचंड हाल !

महासत्ता असलेल्या अमेरिकेला निसर्गाच्या तडाख्यासमोर हतबल व्हावे लागते, तेथे भारताची काय स्थिती होईल, याची कल्पना येते ! अशा आपत्काळात सुरक्षित आणि जिवंत रहाण्यासाठी साधना करून ईश्‍वरी कृपा संपादन करणेच आवश्यक !

नासाच्या ‘पर्सिव्हरन्स’ रोव्हरचे मंगळावर यशस्वी लँडिंग

विज्ञानाद्वारे यान पाठवून अन्य ग्रहांवर जीवसृष्टी होती का ? किंवा आहे का ? याचा शोध घेतला जात आहे; मात्र हिंदूंच्या धर्मशास्त्रानुसार ‘अनेक ब्रह्मांड असून त्यात जीवसृष्टी आहे’, असे सांगितले आहे आणि ऋषी, मुनी, संत, महात्मे यांनी त्याचा अनुभवही घेतला आहे आणि घेत आहेत.

जगाच्या तुलनेत भारतात केवळ १ टक्के वाहने असतांना रस्ते अपघातात १० टक्के लोकांचा मृत्यू होतो ! – जागतिक बँक

आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी जनतेचे प्रबोधन केले नाही किंवा त्यांना शिस्त लावली नाही, हे शासनकर्त्यांना लज्जास्पद !

न्यूयॉर्कमध्ये चाकूद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात २ जण ठार

न्यूयॉर्क येथील सबवेमध्ये ‘हे आतंकवादी आक्रमण होते का?’ हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.