(म्हणे) ‘आगामी काळात भारतीय सैन्य रशियाच्या साहाय्याविना पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाही !’ – अमेरिकेतील एका संस्थेच्या अहवालातील मत

भारतीय सैन्याला न्यून लेखणार्‍यांची सरकारने कानउघाडणी केली पाहिजे ! – संपादक

वॉशिंग्टन (अमेरिका) – रशियाची शस्त्रास्त्रे आणि त्या संदर्भातील अन्य सामग्री यांखेरीज आगामी अन् मध्यम मुदतीच्या काळात भारत पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाही, असे अमेरिकेच्या ‘काँग्रेशनल रीसर्च सर्व्हिस’च्या (सी.आर्.एस्.च्या) अहवालात म्हटले आहे. अमेरिकेने भारताला रशियाकडून शस्त्रास्त्रे घेण्यास विरोध केला आहे. अमेरिका ‘कॅटसा’ या कायद्याच्या अंतर्गत भारतावर निर्बंध लादू शकते.