व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी साजरी केली दिवाळी !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये दिवा लावून केली दिवाळी साजरी !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये दिवा लावून दिवाळी साजरी केली.

१. बायडेन यांनी सामाजिक माध्यमांवर दिवाळी साजरा केल्याचे छायाचित्र प्रसारित करून लिहिले, ‘‘दिवाळी आपल्याला अंधारातून शहाणपणा आणि सत्याकडे, विभाजनाकडून एकतेकडे आणि निराशेकडून आशेकडे जाण्याची आठवण करून देते. अमेरिकासह जगभरात दिवाळी साजरी करणारे सर्व हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन धर्मियांना अमेरिकेकडून दिवाळीच्या शुभेच्छा.’’

२. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी एक व्हिडिओ ट्वीट करून त्यात म्हटले की, अमेरिका आणि जगभरात दिवाळी साजरी करणार्‍या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.

३. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही व्हिडिओ ट्वीट करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले, ‘दिव्यांचा हा सण साजरा करणार्‍या ब्रिटनसह जगभरातील सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.’