कोरोना महामारीसारख्या कठीण काळात आयपीएल् क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे अर्थहीन ! – ब्रिटनचे पत्रकार पिअर्स मॉर्गन

जे एका ब्रिटीश पत्रकाराला कळते, ते भारतातील सरकारी यंत्रणांना का कळत नाही ? देशातील एकही क्रिकेटपटू किंवा क्रीडाक्षेत्रातील व्यक्ती याविषयी बोलत नाही, हे लक्षात घ्या !

पुढील ४५ वर्षांत स्विडन मुसलमानबहुल देश होईल ! – संशोधकाचा दावा

युरोपमधील अनेक देशांमध्ये मध्य-पूर्व देशांतील यादवीमुळे लाखोंच्या संख्येने मुसलमान शरणार्थी पोचले आहेत. त्यांच्यामुळे गेल्या काही वर्षांपासून युरापीय देशांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती वाईट झाली आहे.

इंग्लंडमध्ये भारतीय संगीताच्या अभ्यासासाठी ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्याचा समावेश !

साधना केल्यासच खर्‍या अर्थानेच संगीताचा अभ्यास करता येईल ! असे असतांना संगीताच्या अभ्यासाच्या नावाखाली ‘मुन्नी बदनाम हुई’ सारख्या अश्‍लील गाण्यांची निवड करणे म्हणजे मूळ भारतीय संगीताला ‘बदनाम’ करण्याचा प्रकार आहे !

रणगाडे आणि क्षेपणास्त्र यांनी सज्ज असलेल्या रशियाने युक्रेनला घेरले

रशियाची आक्रमक भूमिका पाहून अमेरिका पुढील आठवड्यात काळ्या समुद्रात तिच्या २ युद्धनौका पाठवण्याची सिद्धता करत आहे. यामुळे जागतिक महायुद्धाची स्थिती निर्माण झाली आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या भीतीमुळे युरोपमध्ये तणाव

रशिया आणि त्याचा शेजारी देश युक्रेन यांच्यात युद्ध होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियाच्या सैन्याने तिची कुमक वाढवली आहे. येथे युद्धाची स्थिती निर्माण होत असतांना फ्रान्सने त्याची युद्ध सिद्धता जोरात चालू केली आहे.

ब्रिटनमध्ये ‘ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनक’ची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी झाल्याने ७ जणांचा मृत्यू

कोरोनावर ‘ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनक’च्या लसीचे डोस ब्रिटनमध्ये दिले जात आहेत. ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी झाल्याने ७ जणांना प्राण गमवावे लागले असल्याची माहिती ब्रिटनच्या मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी या वैद्यकीय प्राधिकरणाने दिली आहे.

फ्रान्समधील ९६ टक्के माध्यमिक शाळांमध्ये गर्भनिरोधक मिळणारी यंत्रे !

पुढील काही वर्षांत अशी स्थिती भारतात येण्यापूर्वीच मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि त्यासाठी धर्माचरणी शासनकर्ते हवेत !

मुसलमानांच्या विरोधानंतर ब्रिटनमधील शाळेत महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवणारा शिक्षक निलंबित !

मुसलमान त्यांच्या धार्मिक भावनांविषयी सतर्क असतात आणि त्वरित त्याचा अवमान करणार्‍यांचा विरोध करतात, तर बहुतांश जन्महिंदु अशा घटनांविषयी निष्क्रीय असतात आणि त्यांच्यात धर्माभिमानही नसतो !

बायोएन्टेक आस्थापन कोरोनानंतर कर्करोगावर लस बनवत आहे !

अमेरिकेतील फायजर आस्थापनासमवेत कोरोना प्रतिबंधात्मक लस बनवणार्‍या जर्मनीतील ‘बायोएन्टेक’ आस्थापनाने आता कर्करोगावर लस आणणार असल्याचे म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत श्रीलंकेच्या विरोधातील प्रस्तावावरील मतदानाच्या वेळी भारत अनुपस्थित !

पाक, बांगलादेश, अफगाणिस्तान आदी शेजारी देशांतील हिंदूंना कुणीही वाली नाही. तसेच आता श्रीलंकेतील हिंदूंचीही स्थिती होणार आहे का ? भारत सरकारने श्रीलंकेतील तमिळी हिंदूंना आश्‍वस्त करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !