अफगाणिस्तान सोडून पलायन करणार्‍या २० सहस्र निर्वासितांना ब्रिटन आश्रय देऊन त्यांचे पुनर्वसन करणार

लंडन – ब्रिटनने अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत परतल्यानंतर तेथून पलायन करणार्‍यांपैकी २० सहस्र निर्वासितांचे पुनर्वसन करण्याची योजना घोषित केली आहे.   ब्रिटनच्या गृह सचिव प्रिती पटेल यांनी ही माहिती संसदेत दिली.

पटेल यांनी सांगितले की, ही योजना वर्ष २०१४ पासून आतापर्यंत सीरियामधून २० सहस्र निर्वासितांचे पुनर्वसन केलेल्या योजनेवर आधारित आहे.