मुंबई – स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) वतीने जगभरात १२ ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रिया, क्रोएशिया आणि मॉरिशस येथे प्रत्येकी १, तर कॅनडा येथे २, अन्य देशांत २ आणि अमेरिकेत ३ ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जगभरातील जिज्ञासूंसाठी इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, सर्बाे क्रोएशियन आणि इंडोनेशियन या ६ भाषांमध्ये ‘सर्वांत चांगला आध्यात्मिक दिवस कोणता ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
अमेरिकेत गुरुपूजनाच्या वेळी साधकांनी अनुभवले प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व !
न्यू जर्सी – राज्यातील माऊंट लॉरेल येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एस्.एस्.आर्.एफ्.चे श्री. कृष्णा मांडवा यांनी गुरुपूजन केले. ‘गुरुपूजनाच्या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र सजीव झाले असून ते आपल्याकडे प्रेमाने पहात आहेत’, अशी अनुभूती उपस्थित साधकांना आली. त्यामुळे त्यांची भावजागृती झाली. या सोहळ्याचा अमेरिकेतील १५० हून अधिक साधकांनी संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून लाभ घेतला. गुरुपूजनानंतर एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू. (सौ.) भावना शिंदे यांचे व्याख्यान झाले.