युरोपियन फूटबॉल स्पर्धेत पराभव झाल्याने इंग्लंडच्या खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका !

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याकडून निषेध !

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

लंडन (ब्रिटन) – येथे झालेल्या युरोपियन फूटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये  इटलीने इंग्लंडचा पराभव केला आणि दुसर्‍यांदा विजेतेपद मिळवले. या सामन्यात पराभव झाल्यामुळे इंग्लंडचे ५५ वर्षांपासूनचे स्वप्न भंगले. त्यामुळे इंग्लंडकडून ‘पेनल्टी शूटआउट’ (एका खेळाडूकडून गोलकिपर असतांना गोलपोस्टमध्ये गोल करण्याचा प्रयत्न. नियोजित वेळेत सामना निकाली निघाला नाही, तर ही पद्धत वापरली जाते.) गोल चुकवणार्‍या ३ खेळाडूंवर वर्षद्वेषी टीका करण्यात आली आहे. इंग्लंडच्या फुटबॉल संघाने खेळाडूंसाठी वापरण्यात आलेली भाषा चुकीची आणि निंदनीय असल्याचे म्हटले आहे. या घटनेवर इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ‘इंग्लंडचा हा संघ वर्णद्वेषी टीकेसाठी नव्हे, तर कौतुकास पात्र आहे. अशा प्रकारची टीका करणार्‍या लोकांना स्वत:ची लाज वाटली पाहिजे’, असे म्हटले आहे.