अफगाणिस्तानच्या समस्येवर ‘जी ७’ देशांची तातडीची बैठक

बोरिस जॉन्सन

नवी देहली – अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यानंतर जागतिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ‘जी ७’ देशांची तातडीची बैठक बोलावली आहे. ‘जी ७’ देशांमध्ये अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, ब्रिटन आणि जपान यांचा समावेश आहे.