जर्मनीमध्ये पुरामुळे ८१ जणांचा मृत्यू, तर १०० हून अधिक लोक बेपत्ता

बर्लिन (जर्मनी) – जर्मनीमध्ये मुसळधार पावसामुळे आलेेल्या पुरामुळे ८१ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.

पुराच्या पाण्यामुळे रस्त्यावरील वाहने वाहून गेली आहेत, तर काही इमारती कोसळल्या आहेत. या पुरामुळे जर्मनीत आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.